धम्म चळवळीत म्हत्वपुर्ण योगदान, लष्करी विभागात तंत्रज्ञान अधिकारी पदी सेवा निवृत्त झालेले राजाराम अस्वरे यांच्या वाढदिवसाच्या औपचारिकता साधुन मान सन्मान.

देहूरोड दि. ०१ जुन

 देहूरोड -: देहूरोड आंबेडकर मार्गावर होणा-या डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार कमानिच्या उभारणीत म्हत्वपुर्ण योगदान मी देणारच आहे.पण देहूरोड च्या पवित्र भुमीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पद स्पर्श झालेले आहेत. तेव्हा जेंव्हा विहाराचे बांधकाम पाडले तेंव्हा सर्वांनी एक निष्ठ, एक संघाने सुंदर असे विहार निर्माण केले .त्याच प्रमाणे आपण एक संघ पणे धम्म भुमी ऐतिहासिक बुद्ध विहाराचे विकास कार्य पुर्ण करु .असे संकल्प उद्गगार धम्म कार्यात म्हत्व पुर्ण योगदान देणारे राजाराम अस्वरे यांनी त्यांच्या यथोचित सन्मानाला उत्तर देताना केले. धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्थेच्या वतीने आंबेडकरी धम्म चळवळीत म्हत्वपुर्ण योगदान देणारे राजाराम अस्वरे  लष्करी विभागात तंत्रज्ञान अधिकारी पदी सेवा करून सेवानिवृत्त झाले.त्याच बरोबर १जुन त्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून राजाराम अस्वरे यांना देहूरोड विश्र्व सुर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार कमानी जवळ च्या उड्डाणपूला खाली आयोजित जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात राजाराम अस्वरे बोलत होते. प्रारंभी संविधान प्रास्ताविक वाचनाने या मंगलमय कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.               बौद्धांचार्य राजेंद्र बेडेकर यांनी संविधान प्रास्ताविकाचे पठन केले. उपस्थितांनी ग्रहण करून संविधान रक्षणाची शपथ घेतली. धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के.एच.सुर्यवंशी यांनी जीवन गौरव पुरस्काराचे वाचन केले.

 धम्मभुमी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष के .एच.सुर्यवंशी कार्याध्यक्ष् अमोल नाईकनवरे , समन्वयक संजय शेंडे, देहूरोड शहर भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष संजय आगळे,जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे,धम्म नेते प्रकाश कांबळे, विजय पवार , रविंद्र चोपडे, परशुराम दोडमणी यांच्या संयुक्त हस्ते सन्मान मुर्ती राजाराम अस्वरे यांना तिरंगा शाल, पुष्पगुच्छ, जीवन गौरव पुरस्कार व संविधान ग्रंथ प्रदान करुन यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी राजाराम अस्वरे यांची सह चरणी उषा अस्वरे यांना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आला. पत्रकार उमेश ओव्हाळ यांनी शाल व साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे पुस्तक प्रदान करून राजाराम अस्वले यांचा सन्मान केला. याच मंगलमय कार्यक्रमात राजाराम अस्वरे सहित धम्म चळवळीतील विजय पवार, राजेंद्र बेडेकर,, अल्ताफ शेख, नारायण खंडागळे यांच्या संयुक्त हस्ते केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या मंगलमय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धम्म नेते के.एच.सुर्यवंशी यांनी केले. तर आयोजन,संयोजन संस्थेचे के.एच.सुर्यवंशी, अमोल नाईकनवरे, संजय शेंडे, धर्मपाल कांबळे,रोहन गायकवाड यांनी केले. 

वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख महाराष्ट्र देहूरोड पुणे.

YOUR REACTION?

Facebook Conversations