महिलेला १५ लाखांचं आमिष दाखवून शस्त्रक्रिया केली आणि नंतर पैसे देण्यास नकार, पुण्यातील घटनेने खळबळ.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पुणे दि. १२ :- पुण्यातील प्रसिद्ध रूबी हाॅल क्लिनिक मध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता आता पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक म्हणजे पुण्यातील नामांकित हॉस्पीटलचा या सहभाग असल्याचं आढळून आलं आहे. 


पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रॅंट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करून यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावरही पोलीसांनी गुन्हा नोंद केलाय. एकूण १५ जणांच्या विरोधात पुणे कोरेगाव पार्क पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवलाय. 


रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. सारिका सुतार या महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. 


त्यानंतर तिने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता. 

या प्रकरणी रूबी हॉल क्लिनिक चे डॉ. परवेज ग्रॅंट, यूरोलॉजिस्ट डॉ भुपत भाटी, कन्सल्टंट नेफरोलॉजिस्ट डॉ अभय सद्रे, न्यूरोलॉजिस्ट डॉ हिमेश गांधी, ग्रेंट मेडिकल फाउंडेशनचे डायरेक्टर रेबेका जाॅन, ट्रान्सप्लान्ट काॅड्रिनेटर सुरेखा जोशी, अमित अण्णा साहेब साळुंखे, सुजाता अमित साळुंखे, सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड आणि अभिजीत मदने अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात आता रुबीहॉल रुग्णालयाच्या डॉक्टरांसह कायदेशीर सल्लागार यांच्यावर फसवणूक व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे किडनी

 प्रत्यारोपणाचा गैरप्रकार हा रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये घडल्यामुळे मॅनेजिंग ट्रस्टी हे तितकेच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या बाबत वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. =================   

 वृत्त संपादक अशोक कांबळे. =================

बातमी व जाहीराती साठी🗣📲📞 {9767508972} {7219500492} {9850826340}

=================

YOUR REACTION?

Facebook Conversations