पुनम महाजन यांच्या पत्ता कट, उज्ज्वल निकम व वर्षा गायकवाड यांच्या मध्ये लढत, तर कोण जिंकेल या कडे सर्वाचे लक्ष केंद्रित.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पुणे दि. :- सद्या राज्यात लोकसभेचा वारे जोरात वाहू लागले आहेत प्रत्येक जागे साठी आप आपले पक्ष कोणता उमेदवार द्यावे व कोणाचे कट होणार हे सांगता येत नाही, अनेक नेते ही खासदारकी साठी गुडघ्याला बाशिंगे बांधून तै्यार आहे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई उत्तर मध्य येथून भाजपचा उमेदवार कोण असणार? याबद्दल चर्चा होती. तर भाजपाच्या वतीने पुनम महाजन यांच्या नावाची चर्चा होती तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड लढणार आहेत. पण भाजपने येथून आता उमेदवारी जाहीर केली आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने संधी दिली आहे. त्यामुळे भाजपमधून उज्ज्वल निकम आपल्या राजकारणाचा प्रवास सुरू करताना दिसणार आहेत. मुंबई उत्तर मध्य येथे पूनम महाजन यांचा भाजपने पत्ता कट केला आहे. यानंतर भाजपमधून अनेकजण या मतदार संघासाठी इच्छूक होते. पण राजकारणात पदार्पण करत असलेल्या उज्वल निकम यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे. महाराष्ट्र भाजपकडून उज्जल निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे मध्य मुंबई मतदारसंघातून वकील उज्ज्वल निकम यांची लढत उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी होणार असून या लढती मध्ये कोण जिंकेल यासाठी सर्वाचे लक्ष वेधून आहे

मुंबईकरांसाठी वर्षा गायकवाड यांच्या चेहरा परिचयाचा आहे व ते शिक्षण मंत्री देखील आहे वर्षा गायकवाड या मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. महाविकास आघाडीच्या काळात त्या मंत्रीदेखील होत्या. 

तर दुसरीकडे उज्ज्वल निकम यांचा चेहरा मुंबईकरांसाठी परिचयाचा आहे. मुंबई हल्ल्यातील सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी केली.  दहशतवादी कसाबला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली. यात निकम यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. खैरलांजी हत्याकांड सारखे संवेदशील प्रकरण त्यांनी हाताळले.  त्यामुळे ही निवडणूक आता कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations