फटाक्यांच्या अतिशबाजी ने व मिठाई वाटून आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले.

देहुरोड दि.14 मार्च

                जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सोमाटणे फाटा इथे असलेला टोलनाका अनधिकृत आणि मुदत संपलेला आहे, त्यामुळे तो टोलनाका कायमस्वरुपी आणि तातडीने बंद करावा या मागणीसाठी टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून जनसेवा समितीचे अध्यक्ष मा.किशोर आवारे यांच्या नेतृत्वा खाली एकूण सात लोक मागील पाच दिवसांपासून तळेगांव स्टेशन येथील विठ्ठल मंदिरात बेमुदत उपोषण करत होते. सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज टोल संबंधित मागण्या मान्य केल्या व अंतिम निर्णय अधिवेशन संपल्यानंतर बैठकित घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे आज अखेर त्यांचा लढा यशस्वी ठरला.


आज संध्याकाळी सहा च्या सुमारास मा. किशोर आवारे यांनी देहुरोड येथील कैंटोंमेंट बॉर्डाचे माजी उपनगराध्यक्ष मा. अमीनभाई शेख यांच्या कार्यालयात भेट दिली. येथे देहुरोड वासियांकडून मा. किशोर आवारे आणि जमीर भाई नलबंद व इतर दोन उपोषणकर्ते यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.फटाक्यांची अतिशबाज़ी करण्यात आली.

किशोर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं च्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष मा. अमीन भाई शेख यांनी मा. किशोर आवारे यांचे अभिनंदन केले तर पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे मावळ तालुका अध्यक्ष मा. परशुराम दोड्डमणि यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. या वेळी ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. तनवीर मुजावर,R. P. I. चे अध्यक्ष मा. सुनील गायकवाड़,दलित समाजा चे ज्येष्ठ नेते विश्वनाथ सर्वदे, R. P. I. चे सत्तार भाई शेख व त्यांचे बंधु, तमिल समाजाचे राजकुमार कालिमूर्ति सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations