आमदार सुनील शेळके यांचे स्वीयसहायक अतुल मराठे यांच्या सह अनेक मान्यवरांचे उपस्थिती.

 देहूरोड दि. २१ :- आरोग्या बाबत काळजी घेणे काळाची गरज आहे जर शरीर तंदुरुस्त व सुदृढ ठेवायचे असेल तर आपण जिम लावणे आवश्यक आहे पण जिम लावायचे म्हटले तर महिनेला भरमसाठ पैसे मोजावे लागतात त्यामुळे अनेक लोक जिम लावण्यासाठी मागेपुढे करतात यासाठी देहूरोड शहरात पुरुष महिलांन साठी अल्प दरात विविध प्रकारच्या साहित्य सह जिम चे भव्य दिव्य करण्यात आले. मुंबई पुणे रोड लगत यश आपर्टमेंट पहिला मजला जुना मुंबई पुणे रोड येथे सम्राट जिमचे दिमाखातात उदघाटन स्वातीताई मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक दिवसांपासून या भागात जिम नसल्याने अनेकांचे गैरसोय झाली होती आता जिमचे नव्याने उदघाटन झाल्याने कसरत करणारे बाॅडी बिल्डर, यांना दिलासा मिळाला आहे . 

सुप्रसिद्ध बाॅडी बिल्डर स्वप्नील गोपाळ तंतरपाळे यांनी आधुनिक दर्जेचे यंत्र व नवनवीन सामग्री सह जिमचे उदघाटन केले आहे या उदघाटन प्रसंगी आमदार सुनील शेळके यांचे स्वीयसहायक अतुल मराठे आणि देहूरोड चे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन जिम चे उदघाटन करण्यात आले या वेळी अतुल मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज आरोग्य विषयी काळजी घेणे खुपच गरजेचे आहे असे वेळी स्वपनील तंतरपाळे यांनी जिम चे उदघाटन करून अनेक महिला पुरुष तरूणांना दिलासा दिला आहे यामुळे अनेक लोकांना याचा लाभ देखील होणार आहे, तरी सर्वानी या जिमचा लाभ घ्यावा असे उदघाटनाच्या वेळी शुभेच्छा दिल्या. 

या वेळी ह्युमन राईट्स फाॅर प्राॅटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनी आज हे जिम चे उदघाटन होत आहे देहुरोडकरांन साठी आनंदाची बाब आहे, फिटनेस राहणे काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले, यावेळी शाहु फुले आंबेडकर मंचचे धर्मपाल तंतरपाळे यांनी जर आपल्याला आरोग्य टिकविण्याचे आहे तर तरूणांना जिम मध्ये जाणे आवश्यक आहे या साठी देहूरोड मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीन तंत्रज्ञान चे जिम उपलब्ध आहे याचा लाभ सर्वानी घ्यावा असे त्यांनी तरूण तरूणांना आवाहन केले. 

या उदघाटन प्रसंगी ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन व द जस्ट आज वृत्त वाहीनीचे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे हे उपस्थित होते या वेळी फुले शाहु आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी शाल श्री फल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी पत्रकार चंद्रशेखर पात्रे यांनी ही उदघाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या. 

या जिम चे संस्थापक प्रशिक्षक स्वप्नील तंतरपाळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले मागील तीन वर्षा पासून देहूरोड मध्ये जिम उघडण्यासाठी धडपडत करत होतो पण योग्य वेळ मिळत नव्हते अनेक तरूण तरूणी या बाबतीत नेहमी जिम कधी उघडणार असे विचारायचे अनेकांनी इच्छा प्रकट केले होते जिम होणे आवश्यक आहे या पुर्वी जिम देहुगांव येथे होते तेथे लांब येणे जाणे असल्याने अनेक जण निराश झाले होते शेवटी मनात निश्चय केला तरूण तरुणीसाठी देहूरोड शहरात अल्पदरात जिम चे उदघाटन करून लोकांना लाभ मिळण्यासाठी हे जिम उघडले आहे तरूण तरुणीसाठी सकाळी ५ व सांयकाळी ६ वाजता हे जिम उघडे असणार आहे विषेशतः महिलांनसाठी महिला प्रशिक्षक असणार असल्याचे जिम प्रशिक्षक स्वप्नील तंतरपाळे यांनी द जस्ट आज वृत्त वाहीनीला माहीती देताना दिली,

 या प्रसंगी पंकज तंतरपाळे यांनी जिम उदघाटन केल्यानंतर जिमचे वैशिष्ट्य सांगितले आज काल तरुण नवजवान पोर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी बाॅडी बिल्डर बणण्यासाठी कसरती करून शरीर स्पर्धा मध्ये भाग घेण्याची इच्छा असणाऱ्यांना हे जिम खुपच उपयोगी पडणार आहे जिम मध्ये नवनवीन पद्धतीचे यंत्र मशीन, डंबल, प्लेट्स, असे साहित्य उपलब्ध केले आहे यामुळे याचा फायदा नक्की तरूणांना होणार आहे अशी माहिती दिली. 

 या उदघाटन प्रसंगी शहर अध्यक्ष प्रविण झेंडे, कृष्णा दाभोळे, हिरामण साळुंखे, ,जाफर  शेख, सुनिल कडलक,  श्याम सिंधवाणी, दिपक चौगुले, हिरामण साळुंखे, संतोष चौगुले, सुभाष चंडालिया विजय पवार, रामभाऊ मनोहरे, सुधीर खंडारे, रमेश पवार रवी पवार, बाबु हिरमेटकर, रज्जाक शेख, बल्ली आण्णा जाफर शेख, रहिनाझ शेख, अर्चना कोळी  जयश्री राऊत,,सुनिता विश्वकर्मा आदि मान्यवर उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations