अर्थ मुव्हर्स असोसिएशन व रिपब्लिकन वाहतूक आघाडीच्या वतीने पत्रकारांचा सन्मान.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

देहूरोड दि. अर्थ मूव्हर्स असोसिएशन व रिपब्लिकन वाहतूक आघाडी देहूरोड शहर यांचा सयुक्त विद्यमाने देहू रोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्थानक चौकात त्याग मूर्ती माता रमाई यांच्या १२६ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. 

प्रारंभी देहूरोड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णाल्यातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रुग्णालयातील जेष्ठ परिचारिकाच्या उपस्थित रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ यामिनी अडबे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर देहूरोड बाजारपेठेत आयोजित कार्यक्रमात माता रमाई यांच्या प्रतिमेस लक्ष्मीबाई गांधी घुसर माॅंसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस आणि माई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक रिपब्लिकन पक्षाचे नेते व अर्थ मूव्हर्स संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत शिवशरण व रिपब्लिकन वाहतूक आघाडी देहू रोड शहर अध्यक्ष गांधी घुसर यांनी उपस्थितांचे  स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य के नाईन वृत्तवाहिनीचे संपादक रामदास ताटे ज्येष्ठ शिवसेना मावळच समन्वयक रमेश जाधव यांनी आपले विचार मांडले. तर मावळ तालुका उपाध्यक्ष मनसेचे नेते मोजेस दास, रिपब्लिक पक्ष जेष्ठ इंद्रपाल रत्तू यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन संयोजन करणारे श्रीमंत शिवशरण, गांधी घुसर, इंदरपाल सिंग रत्तू यांनी पत्रकारांना शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन अर्थ मूव्हर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत शिवशरण, गांधी घुसर इंदरपाल सिंग रत्तू, आरपीआय चे जेष्ठ नेते सुनील गायकवाड, अमित छाजेड, चंद्रकांत आनागोंदे यांनी केले.

 यावेळी विविध माध्यमचे पत्रकारांचे सन्मान करण्यात आला. जेष्ठ पत्रकार विशाल संविधाने उपसंपादक अशोक कांबळे, न्युज महाराष्ट्र के ९ चे संपादक रामदास ताटे, वार्ता जगत न्युज चे मुख्य संपादक मुजफ्फर इनामदार, न्युज एक्सप्रेस १८ चे संपादक श्रीनिवास माने, तालुका न्युज एक्सप्रेस चे संपादक शहनाझ कुरणे, द जस्ट आज वृत्त वाहीनी पुणे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे, पुणे खबर चे संपादक रजाक साहेबलाल शेख तर प्रेस मिडीया लाईव्ह चे प्रतिनिधी अनवर अली शेख यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश जाधव, मावळ तालुका उपाध्यक्ष मनसे नेते मोजेस दास, पश्चिम महाराष्ट्राचे रिपाई सदस्य इंदरपाल सिंग रत्तू, वाहतूक आघाडी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गांधी घुसर, युवक आघाडी अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे अमित छाजेड, मावळ कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, माथाडी कामगार हवेली उपाध्यक्ष चंद्रकांत आनागोंदे भिमशक्ती संघटनेचे ज्येष्ठ नेते महेश गायकवाड, भीम संग्रामचे ज्येष्ठ नेते आनंद साळवे, संतोष शिंदे तसेच महिला नेत्या  लक्ष्मी गांधी घुसर, सपना सचिन मुराळे, सायना अगरवाल आदि उपस्थित होते.

 यावेळी आलेल्या अनुयायांना रिपब्लिकन वाहतूक आघाडी आणि अर्थ मुव्हर्स च्या वतीने सकाळी अल्पोपहार तर दुपार ते सायंकाळी पर्यंत अन्नदान वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्थ मुव्हर्स असोसिएशन चे अध्यक्ष श्रीमंत शिवशरण व न्युज महाराष्ट्र के ९चे संपादक यांनी सुत्रसंचालन केले तर आभार व्यक्त श्रीमंत शिवशरण यांनी मानले.

देहूरोड बाजार पेठ

देहूरोड बाजार पेठ

पत्रकारांचा सन्मान होताना चे छायाचित्र.

पत्रकारांचा सन्मान होताना चे छायाचित्र.

YOUR REACTION?

Facebook Conversations