डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेसला आणखी जनरल डब्बे जोडण्याची रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

पुणे दि. ११ मार्च. 

पुणे लोणावळा, लोणावळा पुणे लोकल    दि. ११ मार्च, १९७८ रोजी फक्त दोन लोकल ने  सुरु झालेल्या पुणे-लोणावळा लोकल सेवेला आज ४५ वर्षे पूर्ण झाली. या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला   ४५व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे ईएमयु मेंटेनन्स विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्कशॅापमध्ये सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. वर्धापनदिन  निमित्ताने लोकल गाडीला सुंदर असे फुलांनी सजविण्यात आले होते.

या वर्धापनदिन निमित्ताने  मध्य रेल्वेचे विभागीय अतिरिक्त व्यवस्थापक श्री. बी.के.सिंग, बी दामोदर, सागर भिल, रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्री.ईक्बाल (भाईजान) मुलाणी, विशाल माने, मयुरेश जव्हेरी व रजनीश कांबळे हे उपस्थित होते. 

करोनाच्या काळात रेल्वे गाड्या बंद करण्यात आले होते आज तगायत काही लोकल गाड्या बंद असल्याने अनेक लोकांचे गैरसोय  होत आहे शाळेकरी काॅलेज व चाकरमानी यांचे हाल होत आहेत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊन काही लोकलगाड्या वाढविण्यात आले सदर करोनाचा काळ संपले असले तरी फक्त चार लोकलगाड्या पुणे लोणावळा व लोणावळा पुणे दरम्यान दिवसभरात फक्त ४० फेऱ्या मारत आहेत सकाळी ११ ते ३ या वेळेत एक ही लोकलगाड्या धावत नाहीत त्यामुळे अनेक चाकरमानी सह लोकांना त्रास सहन करावा लागत आहे  मुंबई किंवा पुणे वरून आलेल्या प्रवाश्यांना लोकल गाडी साठी ताटकळत बसावे लागत आहे.  या बाबत रेल्वे प्रवासी संघटने सहीत लोकांनी नाराजगी व्यक्त केली आहे प्रवासी संघटनेच्या वतीने लोकलच्या फेऱ्यांबाबत विचारले असता येणाऱ्या काही काळात यार्ड रिमॅाडेलिंगचे काम सुरु झाल्यास आणखी काही लोकल शिवाजीनगर पासुन सोडण्यात येणार आहेत. अशी मागणी मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ईकबाल मुलाणी यांनी द जस्ट आज वृत्त वाहीनीला माहीत देताना दिली. तसेच डेक्कन क्वीन , सिंहगड एक्सप्रेसला आणखी जनरल डबे जोडावेत, अशी मागणी या प्रसंगी प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय अतिरिक्त व्यवस्थापक बी.के.सिंग यांचे कडे केली. या समस्येवर लवकरच बैठक घेण्यात येईल असे आश्वासन मध्य रेल्वे प्रशासन अधिकार्यांनी दिले. आता पर्यंत पुण्यात मुंबई मध्ये वापरलेले रेकचा वापर होत असल्याने येणाऱ्या काळात पुण्यासाठी  मेघा बनावटीचे नवीन ईएमयु रेक मिळावेत अशी ईच्छा काही प्रवाशांनी व्यक्त केली. 

YOUR REACTION?

Facebook Conversations