उच्च न्यायालयात दाखल होता खटला, निकाल महापालिकेच्या वतीने.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पुणे दि. : अनेक वर्षे रसिकांच्या मनोरंजन करणारा खडकी स्टेशन जवळील जयहिंद चित्रपट गृह नामशेष झाले आहे मल्टीप्लेक्स च्या दुनिया असल्याने जयहिंद चित्रपट गृह हे सिंगल स्क्रीन चा होता अनेक वर्ष हा लोकाचा मनोरंजन करत होता अनेक वर्षापासून बंद पडलेला आणि वादग्रस्त जागा असल्याने हा चित्रपट गृह बंद अवस्थेत होता आता जयहिंद चित्रपट गृह पुणे- मुंबई रस्त्यावरील  जमीनदोस्त करण्यात आले आहे. महापालिकेने ही इमारत जमीनदोस्त केली. 

पुणे महापालिकेच्या हद्दीत, पुणे-मुंबई रस्ता हा विकास आराखड्यानुसार ४२ मीटर रुंदीचा करण्याचे काम पथविभागामार्फत सुरू आहे. यामध्ये २.२ किलोमीटर रस्ता, खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील रस्ता ४२ मीटर रुंदीचा करण्यात येत होता. मात्र, खडकी रेल्वे स्टेशनसमोरील जयहिंद चित्रपट कॅफे पंजाब रेस्टॉरंट येथील रुंदीकरण येथील पोटभाडेकरू उच्च न्यायायलात गेल्याने हे काम रखडले होते. अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली, 

खडकी रेल्वेस्टेशनसमोरील जयहिंद चित्रपट कॅफे पंजाब रेस्टॉरंट येथील रुंदीकरण येथील पोटभाडेकरू उच्च न्यायायलात गेल्याने हे काम रखडले होते.

२४ एप्रिल रोजी याबाबतचा निकाल पुणे महापालिकेच्या बाजूने लागला.

यानंतर महापालिकेने न्यायालयाच्या सूचनेनुसार मोबदला म्हणून ४३ लाख रुपये न्यायालयात जमा केले.

त्यानंतर डिफेन्स इस्टेट ऑफिसरच्या कार्यालयाशी संपर्क साधून, ही जागा तातडीने ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा केला.

विभागाच्या स्वाक्षरीने मिळकतीचा ताबा पालिकेने घेतला. ही जागा आता मोकळी झाल्याने त्याठिकाणी रुंदीकरणाचे काम

हाती घेतलेले आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा रस्ता मिळणार आहे.

 या कार्यवाहीत पावसकर यांच्यासहीत अधीक्षक अभियंता अमर शिंदे, कार्यकारी अभियंता दिलीप पावरा ,

उपअभियंता गाठे, व कनिष्ठ अभियंता देवडकर सहभागी होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations