नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी म्हणत नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात जोरदार घोषणाबाजी.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 

देहूरोड :- निर्भय बनो कार्यक्रम दरम्यान पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपा पदाधिकाऱ्यांनी जीवघेणा हल्ला करत गाडीच्या काचा फोडून शाईफेक करण्यात काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या विरोधात पोस्ट केली होती त्यावरून त्यांनी पुण्या मध्ये निर्भय बनो सभा घेण्याचा इशारा दिला होता या निर्भय बनो कार्यक्रम साठी आले असता त्याचावर जीवघेणा हल्ला झाला त्याचा निषेधार्थ आज मावळ तालुका युवक काँग्रेस व देहूरोड शहर युवक काँग्रेसच्या वतीने पत्रकार श्री निखिल वागळे, श्री विश्वंभर चौधरी,श्री असिम सरोदे व महिलांवर केलेल्या भाजपाच्या भ्याड हल्ल्याच्या निषेदार्थ निषेध आंदोलन करण्यात आले.

 यावेळी युवक काँग्रेसकडून ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौकात जोरदार आंदोलन करत निषेधाचे घोषणाबाजी करण्यात आले

 "जोर जुल्म कि टक्कर मे संघर्ष हमारा नारा है", 

"नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी"

 "भ्याड हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध" 

" लोकशाहीच्या आवाज दाबणाऱ्या सरकारचा करायचे काय? खाली डोके वर पाय" 

अश्या जोरदार निषेध घोषणाबाजीने संपूर्ण शहर दणाणून सोडले. 

या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारी चंद्रशेखर जाधव, मावळ तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघोले, मावळ तालुका उप संख्यक अध्यक्ष गफूर भाई शेख देहूरोड शहर युवक अध्यक्ष मलिक शेख, मावळ तालुका युवक उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले, उपाध्यक्ष राईस शेख, प्रदेश सोशल मीडिया समन्वयक वसीम शेख, मावळ तालुका युवक सरचिटणीस निनाद हरपुडे, ऋषिकेश येवले, उपाध्यक्ष आसिफ सय्यद, निलेश बोडके, कार्यद्यक्ष हितेशसिंह चहर, रहीम शेख, आदि उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations