देहूरोड शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आयोजित तथागत भ. बुद्ध, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात मंत्री रामदास आठवले यांचे अभिमानास्पद प्रतिपादन.

 देहूरोड दि. ३१ :- देहूरोड शहराशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. दलित पँथर ,भारतीय दलित पॅंथरची संघर्षमय आंबेडकरी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात देहूरोडच्या भीम सैनिकांचा महत्त्वाचा सहभाग होता आता माझ्या पक्ष रिपब्लिकन चळवळीत ही आजतागायत प्रामाणिक सच्चे कार्यकर्ते आहेत. असे अभिमानास्पद प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देहूरोड येथे केले. देहूरोड शहर रिपब्लिकन आठवले यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची आयोजित संयुक्त जयंती महोत्सवात मंत्री रामदास आठवले बोलत होते. 

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन सत्तेत सहभागी झालो आहे. कोणाला वाईट वाटले तर वाटू द्या. एकटे राहून सत्ता मिळणार नाही हे नरेंद्र मोदी भाजपला माहित आहे. त्यामुळे रिपब्लिकन जनतेला घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला सत्ता मिळणार नाही. डॉ .बाबासाहेब आंबेडकर ही मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. त्यांच्या विचाराचे आचरण करून मी मार्गक्रमण करीत असल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आयोजन कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, बाळासाहेब भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी अशोक निकाळजे व अंजली घोडके यांच्या बुद्ध भिमगीतांचा जंगी सामना झाला.

YOUR REACTION?

Facebook Conversations