आता मराठा समाजाचा अंत पाहु नका,दोन दिवसात आंदोलन तीव्र करणार.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पिंपरी चिंचवड दि. ३०:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पिंपरीतील आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने गेल्या पाच दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे आज पाचव्या दिवशी शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व मराठा बंधू भगिनींनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला उपोषण स्थळी आज दिवसभर उपोषण करताना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी भाषणे करून उत्साह निर्माण केला यात प्रामुख्याने मारुती भापकर, इमरान शेख,राहुल आहेर प्रकाश जाधव,अरुण बोराडे,जनाबाई जाधव,नलिनी पाटिल,कल्पना गीड्डे,रेखा चव्हाण,मीरा कदम,सुनिता शिंदे विश्रांती पाडाळे,मोहन जगताप,ज्योती जाधव,सुलभाताई यादव रेखा मोरे, मधूकर उबाळे,यांनी आपल्या मनोगतात मराठा साखळी उपोषणस पाठिंबा दिला.

आजच्या साखळी उपोषणासाठी बाळासाहेब शिंदे,दीपक देशमुख, बाबासाहेब मस्के,सुनील गटकळ, अशोक काटकर,मधुकर उबाळे, रवींद्र इंगवले,प्रकाश बाबर,यांनी विशेष सहकार्य केले आज याचे कामगार संघटना राजमाता जिजाऊ ज्येष्ठ नागरिक संघ महाविकास समिती वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद बहुजन मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महार वतन संघर्ष समिती महाराष्ट्र ,मातोश्री प्रतिष्ठान प्राधिकरण, गडसोसायटी रावेत इत्यादी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाचव्या दिवशी सतीश काळे, वैभव जाधव नकुल भोईर,संतोष शिंदे,गणेश आहेर,रावसाहेब गंगाधरे,निलेश बदाले,प्रशांत जाधव,मयूर पवार,सुलभा यादव, तेजस पवार यांच्यासह ३० मराठा बांधव भगिनींनी उपोषण केले.सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ४० दिवसाची वेळ घेतली होती परंतु आज ४५ दिवस झाले तरी आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्यांची प्रकृती खालावली आहे जर त्यांच्या आरोग्यास काही झाले तर मराठा समाज गप्प बसणार नाही आणि सरकारला हे आंदोलन परवडणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल तेव्हा सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये विना विलंब मराठा आरक्षणाची मागणी मान्य करून समाजास टिकाऊ आरक्षण द्यावे अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या समाजाचे आहेत याचा विचार मराठा समाज करणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल असा इशारा पिंपरी चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज देण्यात आला.

YOUR REACTION?

Facebook Conversations