आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शपथविधी, राज्यमंत्री मंडळात कोणाची लागेल वर्णी याकडे ही सर्वाचे लक्ष.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

दिल्ली दि :- लोकसभेत निवडणुका झाल्यानंतर आता केंद्रात कुणा कुणाला मंत्री पद मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होत आहे. मोदी यांच्यासोबत ३६ खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. मोदी सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे.

टीडीपीने आपल्या कोट्यातील मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. टीडीपी नेते जयदेव गल्ला यांनी एक्स वर पोस्ट केले की, त्यांच्या पक्षाला मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळाले आहे. तीन वेळा खासदार असलेले राम मोहन नायडू हे टीडीपी कोट्यातून नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असतील आणि पी चंद्रशेखर पेम्मासानी हे राज्यमंत्री असतील.

नितिन गडकरी, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, राम नायडू, जयंत चौधरी, चिराग पासवान,जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आले आहे अशी माहिती मिळत आहे.

सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी,पीयूष गोयल , मुरलीधर मोहोळ,रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे , रामदास आठवले यांना फोन आला आहे.दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. तर खासदार श्रीरंग बारणे हे देखील प्रतिक्षेत आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी हेडट्रिक केली आहे

YOUR REACTION?

Facebook Conversations