शहरात दहशत निर्माण, पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी, कुटुंबा समोरच गोळीबार.

 पुणे दि. २२ :- मी खेडचा भाई आहे, एकाला ढगात पाठवले आहे आता तुला ही तेथे पाठवतो म्हणत पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मनसेच्या शहराध्यक्षावर गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचे वातावण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, समीर थिगळे हे आपल्या राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील घरासमोर असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. मी खेडचा भाई आहे, एकाला घालवलाय, तुलाही माज आला आहे. तुला ही संपवतोच असं म्हणत पिस्टल रोखून थिगळे यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार झाला त्यावेळी त्यांचे कुटुंब समोर होते.हल्लेखोरांनी समीर थिगळे यांच्या छातीवर गोळी झाडली. मात्र सुदैवाने पिस्तुलातून गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करुन थिगळे यांना धमकावून घटनास्थळावरुन पळून गेले. या घटनेमुळे थिगळे कुटुंबीय हादरुन गेले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मोक्का आणि खुनासारखे 

गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

आरोपींकडून खंडणीची मागणी करत पिस्तुल रोखत फायरिंग केले.

या घटनेनंतर राजगुरुनगर पोलिसांनी मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations