पाहुणेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयाचे उद्घाटन वेळी अजित पवार यांनी पोलीसांना धारेवर धरले, शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार आम्ही येतो अवैध दारू धंदे बंद करायला, पोलीसांनी निवांत बसून पगार घ्या.

२) पाहुणेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयाचे उद्घाटन वेळी अजित पवार यांनी पोलीसांना धारेवर धरले, शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार आम्ही येतो अवैध दारू धंदे बंद करायला, पोलीसांनी निवांत बसून पगार घ्या. 

बारामती दि. २३:- बारामती मध्ये अनेक दिवसांपासून अवैध दारू धंधेचा सुळसुळाट चालू आहे ग्रामस्थांनी अनेक वेळा अवैध दारू धंधे बंद करण्यात यावे या बाबत अनेक निवेदन देऊन आंदोलन केले मात्र थोडे दिवस बंद करून परत धंधे सुरू केले जाते शेवटी विरोधी पक्षनेते हे बारामतीत पक्ष कार्यालयाचे उद्घाटन साठी आले असता गावकर्यांनी थेट अजित पवार यांच्या हातात अवैध दारू धंदे बंद करण्याचे निवेदन दिले तेव्हा अजित पवार यांनी माझी दारुची भट्टी असली तरी मला पकडा आणि टायरमध्ये घाला, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यावरुन पोलिसांचे कान उपटले. पाहुणेवाडी येथे रविवारी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घटन अजित पवार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.अजित पवार भाषण करत असताना पाहुणेवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांना अवैध धंद्याबद्दल पत्र दिले. हे पत्र भर सभेत त्यांनी वाचून दाखवले. ते "म्हणाले शरद पवार , सुप्रिया सुळे आणि अजित पवार आम्ही येतो दारुच्या भट्ट्या शोधत बसतो. पोलीस निवांत बसून पगार घेतील. तुम्हाला तर मी सॅल्यूटच करतो. मी कितीतरी वेळा सांगतो माझा यात काही हस्तक्षेप नसतो", असे पवार म्हणाले.

 ग्रामस्थांनी दिलेले पत्र अजित पवारांनी भर सभेत वाचून दाखवले. पुणे ग्रामीण व माळेगाव पोलीस ठाण्यांना दारुबंदी होण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता.

मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही, असे पत्रात नमूद केले आहे.

यावेळी "अजित पवार यांनी ग्रामस्थांच्या मागणीचे पत्र पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात देत

सह्यांचा कागद मात्र मी माझ्याकडे ठेवतो नाहीतर हे पत्र मला कोणी दिलं त्यांच्या मागे तुम्ही लागाल", असे म्हणत त्यांनी पोलिसांना धारेवर धरले.

अजित पवार पुढे म्हणाले, पुढच्या वेळी कोणी पाहुणेवाडीचे मला भेटले तर आवर्जून सांगा

की दादा तुम्ही सांगितल्यानंतर पोलिसांनी दारुबंदीसाठी पावले उचलली कि नाही.

पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई इतकी आक्रमक करा की, उद्या माझी जरी भट्टी असली तरी मला सुद्धा टायरमध्ये घाला,

परंतु एकही दारू धंदेवाल्याला सोडू नका, अशा शब्दात अजित पवारांनी पोलीस यंत्रणेला भर सभेत सुनावले. आता पोलीस यंत्रणा किती जागे होऊन काम करतील हे ही पाहणे आवश्यक आहे. अजित पवारांच्या या पोलीसांची कान उपटी बदल ग्रामस्थांन मध्ये चांगली चर्चा रंगली आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations