हत्या झाल्यापासून भानु खळदे देखील पसार, पोलीस पथकाचे शोध जारी.

 द जस्ट आज दि. :- सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीचे प्रमुख जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची १२ मे रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर गोळी झाडून कोयत्याने सपासप वार करून निघृण हत्या करण्यात आली होती. यामध्ये सुरुवातीला चार हल्लेखोरांना अटक करण्यात आले त्यांना कोर्टात हजर केले असता २० मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आले होते नंतर मुख्य सुत्रधार गौरव खळदे याने सुपारी देऊन हत्या घडवून आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता या प्रकरणात मुख्य सुत्रधार गौरवचा पिता चंद्रभान उर्फ भानू खळदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

किशोर आवारे आणि भानू खळदे या दोघांनी मिळून जनसेवा विकास समितीची स्थापना केली होती. दोघे ही जनसेवा समितीचे काम पाहत होते दरम्यान, नगरपरिषद कार्यालयात किशोर आवारे आणि चंद्रभान उर्फ भानुदास खळदे यांचा वाद झाला. तिथे किशोर आवारे यांनी भानू खळदे याच्या कानशिलात लगावली होती. त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदे याने सुपारी देऊन किशोर आवारे यांची हत्या घडवून आणली. हे चित्र आजवर तपासात समोर आले होते. मात्र, या हत्या प्रकरणात स्वतः भानू खळदे याचाही सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. किशोर आवारे यांची हत्या झाल्यापासून भानू खळदे हा देखील पसार झाला आहे.

किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या प्रमुख सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या,

 “आवारे खून प्रकरणात भानू खळदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीस पथके भानू खळदे याच्या शोधासाठी पाठवण्यात आली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील.”

भानु खळदे यांनी दिलेली ‘ती’ फिर्याद खोटी ठरणार का ?

 खळदे याने मागील काही मभानूहिन्यांपूर्वी शिरगाव पोलीस ठाण्यात त्याचे परवानाधारक पिस्तुल हरवले असल्याची फिर्याद दिली होती. त्याचं पिस्तुलातील काडतुसे किशोर आवारे यांच्या शरीरात सापडली. त्यानंतर गौरव खळदे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे तपास केल्यानंतर यामध्ये भानू खळदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे भानू खळदे याने पिस्तुल आणि काडतुसे हरवल्याची दिलेली फिर्याद खोटी ठरणार का. दिशाभूल करण्यासाठी ही फिर्याद देण्यात आली होती का. तसेच या हत्या प्रकरणाचा कट मागील काही महिन्यांपासून शिजत होता का, या सर्व प्रश्नांची उत्तरे भानू खळदे याच्याकडे तपास केल्यानंतर मिळतील. तो पर्यंत हे सर्व प्रश्न गुलदस्त्यातच राहणार आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations