देहूरोड भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर टीजीएच ऑन्स लाईफ कॅन्सर सेंटर, व निरामय रूग्णालयाचा उपक्रम.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 

देहूरोड दि. :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दिनांक २९ मे २०२४ रोजी टीजीएच ऑन्स लाईफ कॅन्सर, डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि निरामय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांनसाठी मोफत स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) तपासणी शिबिर आयोजित केले आहे,  

देहूरोड पंचक्रोशीतील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयचे निवासी वैदकिय अधिकारी डॉ श्रीनिवास चाटे व सह निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ यामिनी अडबे यांनी केले आहे,

 या शिबिरात महिलांना स्पर्श न करता आधुनिक तंत्रचा वापर करत कोणीही न पाहता कुठले वेदनां न होता, कुठलाही त्रास न होता, १५ ते २० मिनिटाच्या क्षणात तपासणीचे निदान होणार असल्याचे डॉ यामिनी अडबे यांनी द जस्ट आज वृत्त वाहीनीला माहिती देताना सांगितले. तेव्हा १८ ते ८० वयाच्या महिलांनी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळात याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations