आणखी११ आमदार भाजपाच्या वाटेवर तर चंद्रकांत हंडोरे, नसीम खान भाजपामध्ये जाण्याची शक्यता.

मुंबई दि. : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा  खळबळ उडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरु असून ते  भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अशोक चव्हाण यांच्यासोबत ११आमदारदेखील भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असल्याचं देखील कळतंय. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवल जात आहे.अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर या बातम्या समोर आल्या आहेत. काँग्रेसचे चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास तो काँग्रेससाठी मोठा धक्का असेल. 

भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे.चव्हाण यांनी आज सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे या चर्चेला उधाण आलं.

 चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेऊन राजीनाम्याची प्रक्रिया समजून घेतली. मी पुन्हा येतो असं सांगून चव्हाण नार्वेकरांच्या कार्यालयातून निघाले. त्यामुळे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनं जोर धरला.भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होऊ शकते. चव्हाण यांच्यासोबतच काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे, नसीम खान देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations