आरोपीचे आई हे नाॅट रिचेबल, पोलीस घेत आहेत शोध तर रक्त नमुने प्रकरणी काही परिचारिकाचे देखील पोलीस करणार चौकशी.

 पुणे दि. :- पोर्शे कार दुहेरी अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी ससून मध्ये रक्ताचे नमुनेचे अदलाबदली प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे ससुन च्या डाॅक्टरांनी अपघात प्रकरणी आरोपी असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलले होते कल्याणी नगर येथील ड्रंक अँड ड्राईव्ह  अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या आईच्या रक्ताचा नमुना घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आई शिवानी अगरवाल यांचा शोध पोलीस घेत आहेत पण शिवानी अगरवाल हे नाॅट रिचेबल येत आहे. 

ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हरनोळ यांनी आधी तपासणीसाठी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले होते, मात्र त्यातून आरोपीने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट होत असल्याने त्याला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले. रुग्णालयात आलेल्या दोन व्यक्तींनी फोनवरून दबाव आणल्याने डॉ. हरनोळ यांनी सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन तीन व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेतले. त्यापैकी एक रक्त नमुना आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांचा होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. आता या रक्ताचे नमुने मध्ये काही परिचारिकाचे देखील पुणे पोलीस चौकशी करणार आहे. या प्रकरणी ससुन चे डीन विनायक काळेना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. 

आता या प्रकरणी पुढील चौकशी करण्यासाठी पोलीस शिवानी अग्रवालचा शोध घेत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations