निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा देहूरोड शहरात पदाधिकारी कार्यकर्त्यांची फटाक्यांची आतिषबाजी आनंदोत्सव व जल्लोष.
326
views

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

देहूरोड दि. :- देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) वतीने रौप्यमहोत्सव (२५व्वा) वर्धापन विजय उत्सव कार्यक्रम देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)  पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी व पुर्ण जल्लोष पणे साजरा करण्यात आला. यावेळी घटक पक्षांचे नेते ही या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आवार्जुंन उपस्थित होते सर्व घटक पक्ष एकत्रित मिळुन वर्धापनदिन साजरा करण्याचे ही शहरात पहीलीच वेळ आहे. यावेळी सर्वांनी पक्षाचा नामघोष करत शरद पवार साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो असे घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडले.

 वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालयासमोर जेष्ठ नेते श्री. वसंत आबा झेंडे यांच्या हस्ते सकाळी १०:१०मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले वर्धापन दिनाचे औचित्य साधून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठ्या प्रमाणात विजय मिळाल्याबद्दल लाडू वाटप करून आनंद  साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरदचंद्र पवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला सामोरे जात विरोधकांचे सामना करीत मोठ्या प्रमाणात विजय मिळवलेला आहे. देहूरोड शहरांमध्ये पक्ष संघटना पक्ष बांधणी व पक्ष वाढवण्यासाठी माझी साथ नेहमी राहील असे मनोगत जेष्ठ नेते वसंत आबा झेंडे यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिक्की कोचर यांच्या  नेतृत्वाखाली घेण्यात आले यावेळी ,पक्ष प्रवक्ते रफिक शेख ,कार्याध्यक्ष महेश केदारी ,तालुका सरचिटणीस कैलास गोरवे, शहर मीडिया विभागाचे अध्यक्ष शिवाजी दाभोळे ,युवक अध्यक्ष सचिन भुंबक ,महिला अध्यक्षा बॉबी डीक्का, अँथोनी स्वामी, गोविंद राऊत ,सुरेश भारस्कर, राजेश कदम, रोहित झेंडे ,आकाश कानापुरम, दीपक कसबे, समीर सेतेलू यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे शिवसेना  शहराध्यक्ष भरत नायडू  समन्वयक रमेश जाधव, जेष्ठ नेते देवा कांबळे ,संदीप बालघरे ,विलास हिनकुले ,काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष गफूरभाई शेख ,बबन टोम्पे ,महबूब गोलंदाज, अली शेख आदी उपस्थित होते .शेवटी आभार प्रकट कैलास गोरवे यांनी केले.

YOUR REACTION?

Facebook Conversations