जी ई इंन्ड्रस्टीयल प्रा. लि. चाकण यांच्या सीएसआर फंडातून विविध शालेय विकास काम चे भूमीपूजन

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

देहूरोड दि. :- जी ई इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड पुणे शिंदे वासुली चाकण यांच्या सीएसआर फंडातून विविध शालेय विकास कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या भुमीपुजन व उद्घघाटन जी. जी. ई कंपनी. अमेरिका चे अध्यक्ष क्रांती टाटा, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य अधिकारी पुष्पांजली रावत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॶॅड. कैलास पानसरे यांच्या संयुक्त  हस्ते झाले.     या शालेय विकास कामात  दोन नवीन वर्ग खोल्याचे बांधकाम आणि  स्वच्छतागृहाचे बांधकाम, नूतनीकरण ,पिण्याचा पाणीच्या टाक्याचा टाकीचे सोय ,शालेय मैदानाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत  जी.  ई.कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अमोल नागर, संदीप वर्मा अभिनित खांडेकर, अमित पालाधी, अमोल नागपुरे, अजय मनसुके हे अधिकारी तर युनायटेड वे एन जी ओ. चे अधिकारी शिवमाखा, राजू चौधरी  उपस्थित होते. 

देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे कार्यालियन अधीक्षक लक्ष्मण तनपुरे, दिलीप कुमार,  धनाजी मुळीक ,देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे शिक्षण  केंद्र प्रमुख एस.  एफ. खान (मॅडम) व  चिंचोली येथील बहुसंख्य ग्रामस्थ ,महिला उपस्थित होते.                    

या वेळी प्रमुख पाहुणे अमोल नागर, प्लांट हेड जी कंपनीचे अजय मनसुके (ऍडमिन हेड) शाळेचे केंद्र प्रमुख एम. एफ .खान. (मॅडम) ग्रामस्थ तुकाराम जाधव, यांनी ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॶॅड कैलास पानसरे आणि शेवटी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांनी मार्गदर्शन केले. तसेच एम. एस. खान तुकाराम जाधव यांनी आपले विचार मांडले.   

सूत्र संचालन  संगीता गाडे, प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर तापकीर  यांनी केले. आभार  रंजना कुंभार यांनी मानले.

YOUR REACTION?

Facebook Conversations