एकुण ४४ महिलांनी घेतला शिबिराचे लाभ. निवासी वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांनी दिली कर्करोग संबधी महत्वपूर्ण माहिती.
426
views

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 देहूरोड दि. :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दिनांक २९ मे २०२४ रोजी टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर रुग्णालय तळेगाव दाभाडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि निरामय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांनसाठी मोफत स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

या स्तन कर्करोग शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असून देहूरोड पंचक्रोशीतील ४४ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. 

देहूरोड पंचक्रोशीतील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयचे निवासी वैदकिय अधिकारी डॉ श्रीनिवास चाटे व सह निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ यामिनी अडबे यांनी केली होती.,

 या शिबिरात महिलांना स्पर्श न करता आधुनिक तंत्रचा वापर करत कोणीही न पाहता कुठले वेदनां न होता, कुठलाही त्रास न होता, १५ ते २० मिनिटाच्या आत तपासणी करण्यात आले. 

१८ ते ८० वयोगटातील महिलांनी सकाळी दहा वाजल्यापासून स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) तपासणी साठी रांग लावून बसले होते प्रत्येक महिलांना तपासणी साठी १५ ते २० मिनटे लागत होते या स्तन कर्करोग शिबिरात एकुण ४४ लाभार्थी होते आणी सामान्य चिकित्सा (नाॅर्मल स्क्रिनिंग) चे ३७ महिला आढळले तर ०२ व संशयित ०५ असे अहवाल मिळाले आहे.

 निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीनिवास चाटे व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ यामिनी अडबे यांनी दिली स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) संबधि महत्वपूर्ण माहिती. 

 "स्तनाचा कर्करोग हा भारतातील सर्वात जास्त् प्रमाणात आढळून येणारा कर्करोग असून, जो वर्ष २०२२ पर्यंत २१६,१०८  रुग्णा मध्ये हा आजार आढळाला असून, एकूण सर्व महिला कर्करोगां पैकी त्याचे प्रमाण २८.२% टक्के आहे.आजच्या काळात ही तपासणी अंत्यंत गरजेची आहे कारण स्तनाचा कर्करोग खुप वाढत चालला आहे,प्रत्येक ८ महिलेच्या मागे एक असे प्रमाण आढळून आले आहे, ही तपासणी अगदी सोपे असून १८ वयापासून ते ८० वयोगटा पर्यंत यांची तपासणी करून निदान करता येते. अनेक महिला या स्तन कर्करोगाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अनेक महिलांना जीव ही गमवावे लागत आहे. वेळेवर याचा औषधोपचार करणे आवश्यक आहे".

या शिबिरात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे वैद्यकीय निवासी अधिकारी डॉ श्रीनिवास चाटे, सहायक वैद्यकीय निवासी अधिकारी डॉ यामिनी अडबे, मेट्रन प्रभा कोकाटे, टीजीएच ओन्को लाईफ कॅन्सर तळेगाव रुग्णालयाचे डॉ संगिता पाटील, टेक्निशियन प्राजक्ता सुतार कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयाचे देखरेख करणारी शमा मावशी व मदतनीस श्रीकांत बंडगर तर फुजी कंपनी कडून आरती भालेराव यांनी काम पाहिले.

YOUR REACTION?

Facebook Conversations