अनेक सामाजिक राजकीय नेत्यांच्या पत्राला केराची टोपली. भेटायला गेले असता वेळ न देता तीन तास ताटकळत बसायची वेळ

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

देहूरोड दि. :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांनी  पदभार हाती घेऊन खुर्ची वर विराजमान झाले, पण आपल्या पदाचा गैरवापर करत जनतेला मूलभूत सुविधा न देता मनमानी कारभार करत असल्याने देहूरोड शहराच्या जनते मध्ये असंतोष निर्माण झाला आहे अनेक सामाजिक संघटना राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील लोक मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना कार्यालयाचे बाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे, कार्यालयाच्या दरवाजे बाहेर भेटण्याची वेळ तीन ते पाच असा वेळ दिलेला आहे पण हे वेळ काहीच कामाचे नाही, दिलेल्या वेळेत एकही लोकांना ते वेळ देत नाही त्यामुळे अनेक सामाजिक राजकीय पक्षाचे नेते सामाजिक नेते पुन्हा नाराज झालेले आहे, देहूरोड मध्ये अनेक समस्या असल्याने समस्याचे निवारण करण्यासाठी लोक त्यांची भेट घेण्यासाठी जातात पण या लोकांना तीन-तीन तास ताटकळुन बसण्याची वेळ या सामाजिक संघटना राजकीय पक्ष नेत्यांवर आले आहे त्यामुळे देहूरोड शहरांमध्ये सीईओ पुष्पांजली रावत बाबत नाराजीचे सूर निघत आहे व अनेक लोक असे अधिकाऱ्यांचे ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी असेही नाराजीचे सूर लोकांकडून निघत आहे.  यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी गीता कश्यप, आताच बदली होऊन गेलेले सीईओ माने असे अधिकारी होऊन गेले त्यांच्या कार्यकाळात त्यांना कधीही भेटण्यासाठी गेले असता, समस्या सांगितल्याने ते समस्याचे पूर्णपणे निवारण करत होते व स्वतः येऊन समस्याचे ठिकाणी येऊन बघत होते आणि समस्या सोडवित होते आत्ता रुजू झालेले पुष्पांजली रावत हे अजिबात वेळ न देता माझ्या कडे अजिबात येऊ नका कॅन्टोन्मेंट बॉर्ड मध्ये संबंधितअधिकारी यांना भेटून तुमचे समस्याचे निवारण करा असे भूमिका घेतल्याचे समजते त्यांच्या या कारभारामुळे देहूरोडकर जनतेत असंतोष निर्माण झाला आहे, ह्यूमन राईट्स जस्टीस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर जनरल सेक्रेटरी चंद्रशेखर पात्रे व पदाधिकारी गीतांजली रावत यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी वेळ दिले नाही तसेच ह्यूमन राईट्स फॉर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी हे ही भेटण्याची वेळ मागीतले असता वेळ दिला नाही समस्या पुर्तीसाठी पत्र दिले असता समस्या चे निवारण देखील केले नाही ,मानव आधार सामाजिक संघचे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर यांनी ही नाले सफाई व वीज खांब ड्रेनेज कामांचे समस्या सोडविण्यासाठी गेले असता वेळ दिला नाही शेवटी त्यांनी समस्याचे एक खरमरीत पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांना दिला ,तर फुले शाहू आंबेडकर मंचचे  संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे हे अनेक वर्षांपासून नागरिकांच्या समस्या मिटवण्यासाठी झटत असतात रावत यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितले वेळ घेतले असता त्यांना वेळ न देता तीन तास त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह कार्यालयाच्या बाहेर  ताटकळत बसुन ठेवले धर्मपाल तंतरपाळे यांनी आता सर्दन कमांड पुणे येथे मोठा आंदोलन व उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यासाठी अनेक लोकांनी पाठींबा दर्शविला आहे, अशीच एक तक्रार शितळानगर क्रमांक दोन येतील सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष टी शेकन्ना यांनी ही अनेक वेळा गेले असता त्यांना वेळ दिला नाही ते अनेक वर्षापासून लोकांची सेवा करीत आलेले आहे आता ही करत आहे अनेक समस्या पूर्ती केली आहे आज त्यांना मधुमेहाचा आजार असल्याने डोळ्याने नीट दिसत नाही तरीही ते मानवता सेवा कार्य करत आहे दिनांक २९ मे २०२४ रोजी बोर्ड कार्यालयात शितल नगर क्रमांक दोन मधील हनुमान मंदिराजवळ सार्वजनिक नळाचे जळवाहिनीचे पाईप तुटले आहे महिने झाले पाणी वाहत आहे हजारो लिटर पाणी तिथे वाया जात आहे महिला पुरुष शौचालय मध्ये लाईट नाही शौचालय जवळ खुले मैदान असल्याने रात्रीच्या वेळी महिला पुरुष हे शौचालय मध्ये जात असतात खुले मैदान असल्याने व गवत दगड असल्याने साप विंचू चा वावर आहे तेव्हा शौचालय समोर लाईट लावण्यात यावा यासाठी ते पत्र घेऊन भेटण्यास गेले असता त्यांनाही पुष्पांजली रावत यांनी भेट दिली नाही आता याबाबत देहूरोडकर जनते मध्ये पुष्पांजली राऊत बाबत असंतोष निर्माण झालेला आहे याबाबत अनेक सामाजिक संघटनेने पुष्पांजली रावत बाबत सर्दन कमांड सह दिल्लीला पत्र व्यवहार केले आहे आणी त्यांची हकालपट्टीची मागणी केली आहे तर काही सामाजिक संघटना शैक्षणिक संघटना नगरसेवक हे तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. 

तर देहुरोडकर जनतेमध्ये दबक्या आवाजात पुष्पांजली रावत यांचे पती हे दिल्लीला कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कमिटी वर पदाधिकारी असल्याने पुष्पांजली रावत हे घाबरत नाही असे लोकांमध्ये खमंग चर्चा देखील आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations