देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड ने भरमसाट केलेल्या टेक्स दरवाढ , सिध्दीविनायक नगरी पाणी प्रश्न, पीपीई अक्ट नोटीस, व बाजारात पदपथावर दुकान मांडलेल्या च्या समस्या वर स्वतः गाठीभेटी घेऊन दुकानदारांना दिला दिलासा.

देहूरोड दि. १३ :-(प्रतिनिधी -चंद्रशेखर पात्रे)

               देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड ने सन २०२२ ते २०२५ करीता त्रैवार्षिक मुल्यांकन कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिनियम २००६ कलम ११६ (१ व २) नुसार वाढ केली होती व हरकती साठी ८ जानेवारी पर्यंत मुदत दिली होती परंतु अनेक नागरिक परगावी गेल्याने अनेक लोकांना हरकती नोंदविता आले नाही.

या बाबत द जस्ट आज वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे व विशाल संविधान वृत पत्राचे जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांना अनेकांनी विचार पुस केले होते नागरिकांच्या या प्रश्नाबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड चे कार्यालीन अधिक्षक राजन सावंत यांना विचारले असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमित कुमार माने यांच्याशी चर्चा केली त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी हरकती चे मुदतवाढ आणखी सात दिवसांनी वाढविले असे सांगितले होते.

 आज दिनांक १३ जानेवारी ची आखरी मुदत होती पण आज दिनांक १३ जानेवारी रोजी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने यांच्या दालनात आज बैठक घेऊन नागरिकांचे काय विविध प्रश्न आहे या बाबत मिटिंग घेतली, या बैठकीत प्रथम सिध्दीविनायक नगरी येथील पाणी प्रश्नना बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने यांना विचारले असता पाईपलाईन चे काम सिध्दीविनायक नगरी, चिंचोली, झेंडे मळा किन्हई गावात पाईपलाईन चे काम जवळ जवळ झाले आहे लवकरात लवकर पाणी पुरवठा करण्यात येईल असे सांगितले.

         कृष्णा खोरे मंडळातून ५ कोटी रुपये मंजूर झाले होते परंतु डिफेन्स खात्याचे विरोध झाल्याने ते स्थगित झाले असे सांगितले त्यावर आमदार सुनिल शेळके यांनी ५ कोटी रुपये मिळविण्यासाठी परत (रि-प्रपोजल) प्रयत्न करणार असे बोर्डाला निधी कमी पडु देणार नाही असे सांगितले.

         कॅन्टोन्मेंट बोर्ड चे लोक प्रतिनिधी ॶॅड कैलास पानसरे यांना ही या संदर्भात विचारले असता पानसरे यांनी मी पुर्णपणे या बाबत सहकार्य करीन बोर्डाला निधी कशा प्रकारे मिळवता येईल मी पुर्णपणे मदत करीन म्हणून सांगितले. आमदार सुनील शेळके यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड ने भरमसाट करवाढ केले या बाबत विचारणा केली व आता पर्यंत किती हरकती आल्या असे विचारले असता कार्यालयीन अधिक्षक राजन सावंत यांनी आता पर्यंत ७००० लोकांनी हरकती नोंदविले आहेत तर आजचा शेवठ दिवस आहे असे म्हटले या वर शिवसेनेचे शहरप्रमुख भरत नायडू यांनी आमदारा समोर मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने यांना विनंती करत म्हणाले बरेच लोक या बाबत अनभिज्ञ आहेत काही लोक परगावी असल्याने हरकती नोंदविलेले नाहीत तरी आपण परत थोडी मुदतवाढ करावी अशी विनंती केले असता मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने यांनी परत सात दिवसांची मुदत वाढ करण्याचे मान्य केले. व शेवटची तारीख जाहीर करू असे सांगितले.या वेळी ह्युमन राईट्स जस्टीस असोशिएशन चे जिल्हा सचिव चंद्रशेखर पात्रे यांनी करवाढ बाबत अमित कुमार माने यांना विचारले आपण जे करवाढ केले आहे ते भरमसाट आहे सर्वाना एक सारखे करवाढ केले आहे काही लोकांचे पत्रेचे घर तर काहीचे मातीचे व पक्की घरे आहेत त्या सर्वांना वेगवेगळ्या कर न आकारता एक सारखे करवाढ केले आहे या बाबत अमित कुमार माने यांनी यावर ही पुर्नविचार करू व योग्य निर्णय घेऊ असे सांगितले. आता करवाढ हे ६० ते ७० टक्के आहे हरकती आल्यावर हे ही कमी होतील पण किती कमी होतील हे नाही सांगितले.

             कॅन्टोन्मेंट बोर्ड ने अनेक दुकानदार व्यवसायिकांना पीपीई नोटीस दिल्याने या बाबत अनेक छोटे मोठे व्यवसायिक घाबरले आणि देहूरोड मध्ये या बाबत उलटसुलट चर्चा होत आहे अनेकांना वाटत आहे कि आता आपले दुकान तुटणार कि काय? किंवा पर्यायी मार्ग म्हणून दुकान नोंदणी करून घेतील का असे संभ्रम निर्माण झाले आहे, आपण दिलेली पीपीई नोटीस हे बेकायदेशीर आहे या वर आपले मत काय या बाबत ही आमदार यांनी विचारले, पीपीई नोटीस बाबत अमित कुमार माने यांनी पीपीई नोटीस बाबत परत शासनाला प्रक्रिया पाठवण्यात येईल व या संबंधी सरकारी प्रणाली वर माहिती देणे आवश्यक आहे असे सांगितले यावर आमदार सुनील शेळके यांनी पीपीई नोटीस बाबत सांगितले कि २० वर्ष जुने दुकान आहे ते त्यांच्या वर लागु होऊ शकत नाही आणि नवीन असो जुने असो त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे असे कुणालाही बेघर करता येणार नाही असे ही सांगितले त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे आणि अमित कुमार माने यांनी ही याबाबत पुर्ण विचार करू नुकसान होईल असे न करता पर्याय मार्ग अवलंबन करू असे आश्वासन दिले.

      राष्ट्रवादी चे युवक अध्यक्ष अशिष बंसल यांनी देहूरोड बाजारपेठेत पदपथावर दुकान मांडले गेले आहे ते येण्याजाण्याचा रोडवर सामान ठेवत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे असे सांगितले या वर आमदारांनी असे सुचविले कि त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावा या वर अमित कुमार माने यांनी त्यांना महात्मा गांधी शंकर मंदिर येथे जागा उपलब्ध करून देऊ असे सांगितले. बाजार पेठेत अनेक हातगाडी वाल्यांना जशे मंगल कार्यालय येथे जागा उपलब्ध केले तसेच त्यांना ही करून देऊ असे माने यांनी सांगितले.

        बैठक झाल्यानंतर आमदार सुनील शेळके हे स्वतः बाजार पेठेत आले व पदपथावर दुकान व्यवसायकांना समस्या विचारले असता व्यवसायकांनी आम्ही अनेक वर्षा पासून येथे व्यवसाय करत आहे त्या बदल्यात आम्ही रोज पावती देखील फाडत आहे आमचे पोट यावर निर्भर आहे असे अनेकांनी सांगितले या वर आमदारांनी व्यवसायकांना जो पर्यंत पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तो पर्यंत आपण येथेच व्यवसाय करावा व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने व अधिकारी यांना ही सांगितले यांना तात्पुरता येथे व्यवसाय करू द्या जो पर्यंत पर्यायी जागा उपलब्ध होत नाही. यावेळी व्यवसायकांनी आमदार सुनील शेळके व अमित कुमार माने यांचे आभार व्यक्त केले.

 या बोर्ड बैठकीत देहूरोड शहराध्यक्ष ॶॅड प्रविण झेंडे, माजी अध्यक्ष ॶॅड कृष्णा दाभोळे, शिवसेना शहराध्यक्ष भरत नायडू, देहूरोड शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुतू, शिवसेनेचे जेष्ठ नेते रमेश जाधव, असे विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations