मानव आधार सामाजिक संघटनेचे कर्तृत्ववान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दशरथ शेट्टी, महिला नेत्या धनश्री शेट्टी यांच्या उपस्थितीत भक्तिमय कार्यक्रमांनी सांगता.

वृत्त संपादक अशोक कांबळे.

  देहूरोड दि. ०६ ;- भक्तिमय वातावरणात देहूरोड गांधीनगर दुर्गा माता मंदिरात नवरात्रोत्सवाचा १७ संप्टेबर ते ५ ऑक्टोबर दसरा नवरात्रोत्सवाचा विविध भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमांनी सांगता झाली. सांगता कार्यक्रमांत दसरा दिनी दुर्गा माता मंदिर समितीचे बाबू हिरमेटकर ;राजु गोडसे ,सुरेश जगदाळे (पुजारी ) यांच्या हस्ते पहाटे अभिषेक ,महापूजा आरती झाली. सकाळी ९ वा.बाबु हिरमेटकर त्यांच्या सुविद्य पत्नी शिवाली  हिरमेटकर व महिला पुरूष भाविक भक्तांच्या उपस्थीतीत होमहवन झाले. सकाळी १० वा. देवीची पालखी मिरवणूक वाजत गाजत मंदिरा पासून प्रारंभ झाला. पुढे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर वसाहत मार्गे श्री दत्त मंदिरा भारतरत्न डाॅ . बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून देहूरोड बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून माता माता की जय दुर्गा माता की जय जय घोष करीत पुन्हा गांधीनगर दुर्गा माता मंदिरा जवळ पालखी मिरवणूकीची सांगता झाली. 

 दुपारी १२ वा. मानव आधार सामाजिक संघटनेचे कर्तृत्ववान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दशरथ शेट्टी व महिला अध्यक्षा धनश्री शेट्टी यांच्या हस्ते दुपारचे महाआरती झाली.त्यांच्या हस्ते अन्न प्रसाद वाटप प्रारंभ झाला. बहुसंख्य भाविक भक्तांनी अन्न प्रसादाचा लाभ घेतला. मानवतावादी नेते दशरथ शेट्टी यांनी नवरात्रोत्सवाचा भक्तिमय नियोजना बद्दल युवक संयोजकांचे कौतुक करून विजया दशमीच्या भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देऊन नवरात्रोत्सवाचा सांगता केली. बाबू हिरमेटकर, राजू गोडसे, सुरेश जगदाळे पुजारी, शाम मासे, यल्लाप्पा मामा पुजारी, रूतेश अलकोंडे ,जगदीश जगदाळे यांनी संयोजन केले. 

•••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी संपर्क. 

{9767508972}

{7219500492}

{9850826340}

•••••••••••••••••••••••
                                   

YOUR REACTION?

Facebook Conversations