तुझ्या मुळे आमच्या माणसाने आत्महत्या केली, आता तुझा मर्डरच करतो, सेंट्रल चौक येथे रिक्षातून ढकलून दिले

देहुरोड :- तुझ्या मुळे आमच्या माणसांने आत्महत्या केली म्हणून  एका व्यक्तीचे अपहरण करून गंभीर जखमी केल्याने देहुरोड पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे.  ही घटना मंगळवारी २० सप्टेंबरला रात्री १० वा. च्या सुमारास देहुरोड चिंचोली गावात घडलेली आहे.

या गुन्ह्या बाबत महेश यमगड्डी, वय २२ वर्षे, रा. भैरवनाथ मंदिरामागे चिंचोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांनी देहुरोड पोलिसांना फिर्याद दिली आहे. या प्रकरणी देहुरोड पोलीसांनी राजू देवरमणी, वय ४९ वर्षे, अक्षय देवरमणी, वय २४ वर्षे, शिवराज देवरमणी, वय ५८ वर्ष, वैभव नाईक, वय ३० वर्षे, दीपक सौदे, वय ३७ वर्षे, सर्व रा. गांधीनगर देहूरोड, तालुका हवेली, जिल्हा पुणे या पाच आरोपींना  अटक केली आहे.

कुणाल कटारे हे या प्रकरणात सहावा आरोपी आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३६४, ३०७, १४३,, १४४, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनि दिलेल्या माहितीनुसार,आशिष देवरमणी याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याचा मनात राग धरून मयत देवरमणीचे नातेवाईक या प्रकरणातील आरोपी रिक्षा मधून फिर्यादीच्या राहत्या घरी आले. त्या ठिकाणी फिर्यादीला फिर्यादीचे भाऊ तायप्पा यांना बाहेर बोलाविल्याने फिर्यादी बाहेर आले असता आरोपी राजू देवरमणी याने फिर्यादीच्या गळ्यात हात घालून जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले व त्यानंतर तोही स्वतः रिक्षात बसला. त्या नंतर आरोपी अक्षय देवरमणी, शिवराज देवरमणी दिपक सौदे व कुणाल कटारे हे ही त्या रिक्षात बसले.

तेव्हा फिर्यादीचे भाऊजी तायप्पा व फिर्यादीची आई हे त्यांना आडविण्यासाठी आले असता आरोपींनी फिर्यादीची भाऊजी व आई यांना ढकलून दिले. आरोपी वैभव नाईक यांनी ती रिक्षा चालवीत देहू रोडच्या दिशेने निघाले. रिक्षात बसलेले सर्वजण फिर्यादीला म्हणाले की, तुझ्यामुळे आमचा आशिष गेला तुला जीवंत सोडणार नाही. तुझा मर्डरच करतो असे म्हणत फिर्यादीला हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण केली.त्या मुळे फिर्यादी गंभीर जखमी होऊन रक्त बंबाळ झाले. आरोपी कुणाल कटारे याने त्याच्या जवळील सुरा काढून फिर्यादीला जीवे मारण्यासाठी हल्ला केला परंतु फिर्यादीने तो चुकवला. त्या नंतर फिर्यादीला सेंट्रल चौक देहूरोड येथे रिक्षातून रस्त्यावर ढकलून  पसार झाले. 

देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

••••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती🗣📲📞

{9767508962}

{7219500492}

{9850826340}

•••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations