सन्मान पत्र सोहळ्यात प्रेस मीडिया लाईव्ह च्या वतीने बहुसंख्येने सर्वानी उपस्थित राहण्याचे सर्वाना नम्राचे आवाहन.


पुणे दि. २२:- पुणे येथील आघाडीचे न्यूज पोर्टल प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापन दीन सोहळा दिनांक २९ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कोल्हापूर येथे श्री राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर चे मा.आमदार श्रीमती जयश्री जाधव ,कार्येक्रमाचे सरचिटणीस समाजवादी प्रबोधिनी चे अध्यक्ष श्री. प्रसाद कुलकर्णी, तर कार्येक्रम प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक लोकसत्ताचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री. दयानंद लीपारे , ज्येष्ठ कवी श्री पाटलोबा पाटील , दैनिक ग्रामदेवता चे संपादक श्री.सखाराम जाधव हे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमास विशेष सहकार पुणे येथील लिमरा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा. हाजी नाझीम शेख , इचलकरंजी येथील जनसामान्यांचा प्रहारचे संपादक विकास गायकवाड , कोल्हापूरचे माजी नगरसेवक श्री. ईश्वर परमार ,या सर्वांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री मुरलीधर कांबळे ( पत्रकार ) हे आहेत या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस मीडिया लाईव्ह च्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती प्रेस मीडिया लाईव्ह चे संपादक मोहसिन सर्जे खान यांनी द जस्ट आज वृत्त वाहीनीला माहिती देताना दिली.

YOUR REACTION?

Facebook Conversations