वयाच्या ५५ वर्ष पुर्ण केलेल्या घरेलू कामगारांना शासनाच्या वतीने १० हजार रुपये सन्मान धन .
महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती व कष्टकरी संघर्ष महासंघाच्या प्रयत्नांना यश, घरेलू कामगारांना मध्ये आनंदाचे वातावरण साखर वाटप करून समाधान व्यक्त.

 पुणे दि. २ :- अनेक वर्ष घरकाम करणारे मोलकरीण काम करत असताना कुठल्याही कामाची शाश्वती नसताना घर मालकाकडे काम करून देखील कुठले ही लाभ फायदे मिळत नव्हते अनेक कामगार संघटनेने शासन दरबारी पाठपुरावा केला तेव्हा महाराष्ट्र शासनाने घरेलू कामगार यांच्या साठी महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची" स्थापना केली मंडळाच्या अर्थसंकल्पानातुन महिला पुरुष घरकाम करणाऱ्यासाठी साडे सहा कोटी रुपयाची तरतुद केले. त्यात घरेलू कामगारांन साठी १) "जनश्री विमा" योजने अंतर्गत घरेलू सदस्यांना नैसर्गिक मृत्यू ओढवल्यास वारसदारांना ३०००० रूपये मदत, अपघाती मृत्यू ओढवल्यास वारसदारांना ७५००० रूपये मदत,अपघातीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ७५००० रूपये मदत, अपघातीमुळे अंशतः अपंगत्व आल्यास ३७५०० रूपये मदत, तसेच सदस्यांच्या दोन मुलांना इ. ९ वी ते इ. १२ वी व आय टी आय साठी, प्रतिमाह १०० रूपये प्रत्येकी लाभ, २) "राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना" अंतर्गत सदस्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचारासाठी प्रतिवर्ष ३०००० रूपये, सदस्यांना रुग्णालयात दाखल करताना कोणत्याही रक्कम भरण्याची गरज नाही, रुग्णालयात येणे जाणेसाठी जास्तीतजास्त १०० रुपये ते १००० रूपयेची मदत, तसेच या योजने अंतर्गत सर्व शासकीय दवाखाने (ईएस आयसी) आणि खाजगी पात्र दवाखाने मार्फत सेवा पुरविणे,

 ३) "अंत्यविधी साठी" सदस्यांच्या अंतविधीसाठी वारसांना २००० रूपये तातडीने मदत, या व्यतिरिक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, अपघाताच्या वेळी तातडीची मदत असे अनेक सवलती शासना तर्फे जाहीर केले व सर्व प्रथम सुरूवात २०११ मध्ये पुण्यात यांची सुरूवात झाली होती आज संपूर्ण महाराष्ट्रात लाखो घरेलू कामगारांनी सदस्यत्व नोंदवले याचे फलस्वरूप आज घरेलू कामगार वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळात नोंदणी असलेल्या पात्र घरेलू महिला कामगारांना घरेलू कामगार मंडळाच्या वतीने १०००० रुपये सन्मानधन मिळायाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती व कष्टकरी संघर्ष महासंघाच्या प्रयत्नाला यश आलेले आहे. यामुळे घरेलू कामगार सदस्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे याचे स्वागत घरेलू कामगार महिला पुरुषांनी एकमेकांना साखर वाटप करून करत आहेत. 

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, महिला अध्यक्षा माधुरी जलमुलवार अनिता घाडगे, कांताबाई गाडे, मनीषा भागवत, अर्चना चंदनशिवे, सुरेखा भंडारे, रेश्मा चव्हाण, शबाना पठाण, सविता टेकाळे, सविता प्रधान, चंद्रकला वाघमारे, विद्या तरकसे आदी घरेलू कामगार महिला उपस्थित होते.

 महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांना आरोग्य विमा मिळावा, अपघाती विमा संरक्षण मिळावे व महामंडळ पुनर्जीवित करावे या मागणीसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाने हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे भव्य मोर्चा काढला होता. यावेळी कामगार मंत्र्यांशी सन्मानधना बाबत सकारात्मक चर्चा झाली होती.

त्याच बरोबर कामगार उपायुक्त अभय गीते यांची भेट घेऊन सदरच्या योजनेतील वयाची अट कमी करावी तसेच नूतनीकरणाच्या जाचक अटी कमी कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली होती . सतत पाठपुरावा पुरावा केल्याने महासंघाचे प्रयत्नाला यश मिळालेले असून घरेलू कामगार मंडळाच्या सन्मानधन योजना अंतर्गत १० हजार रूपये रक्कम अटींची पूर्तता केलेल्या शहरातील लाभार्थ्यांना मिळायला सुरुवात झाली याबद्दल घरेलु कामगारांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. सतत पाठपुरावा केल्यामुळे हे लाभ घरेलू कामगार मिळत आहे त्यामुळे संघटनेचे ही आभार घरेलू कामगार मानत आहेत दहा हजार सन्मान धन मिळाल्याने घरेलू कामगार मध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations