"विश्डम इंग्लिश हायस्कुलचा उदात्त कार्य "
विश्डम इंग्लिश हायस्कूलच्या वतीने १० पात्र आर्थिक दुर्बल घटकातील १० गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.

देहूरोड दि. १६ : - देहूरोड च्या ख्यातनाम साऊथ इंडियन असोसिएशन म्हणजे दक्षिण भारतीय संघ या नावाजलेल्या संस्थेचे  देहूरोड विकासनगर मधील स्व.सेठ हुकमीचंद अनराज बरलोटा विस्डम हायस्कूल या इग्रंजी माध्यमा च्या शाळेत  स्व.हुकमीचंद अनराज बरलोटा यांची   जयंती हर्षो उल्हासात साजरी करण्यात आली. या जंयती कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  जिल्हा भारतीय  जनता पार्टी उपाध्यक्ष रविंद्र उर्फ लहुमामा शेलार यांचे हस्ते स्व. हुकमीचंद अनराज बरलोटा यांच्या प्रतिमेस तथा त्यांचे गुरु गणेश मजली   यांच्या प्रतिमेस पुष्प माला अर्पण करून  दीप प्रज्वलन करून् आदरांजली वाहण्यात आली. शाळेतील इयत्ता १ली ते १० वी २०२२- २३ सालात प्रथम क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना रविंद्र उर्फ लहु मामा शेलार  यांचे हस्ते  १०००/- रू.रोख पुरस्कार आणि स्मृती चिन्ह प्रदान  करून गौरवण्यात आले .                         शाळा व्यवस्थापनाच्या वतीने २०२२-२०२३ सालात दहा पात्र आर्थिक दुर्बल घटकातील १० गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण  देऊन एक उदात्त कार्य केले आहे.                              

 या वेळी  प्रमुख पाहुणे  रवींद्र उर्फ लहु मामा शेलार यांच्या हस्ते शाळेतील नवीन तीन कर्मचारी कक्षांचे उद्धघाटन करण्यात आले.   शेलार यांनी शाळेतील नवीन  प्रयोग शाळेसाठी उपकरणे देण्याचे जाहीर केले. साऊथ इंडियन असोसिएशन तथा एच. ए.बरलोटा विश्डम इंग्रजी माध्यम महाविद्यालयाचे अध्यक्ष  जयशंकर जयसिंग यांच्या हस्ते प्रमुख अतिथी रविंद्र उर्फ लहु मामा शेलार यांना शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मान करण्यात आला.                       या वेळी सरचिटणीस पार्वती एस बाबू, उपाध्यक्ष  जेकब नाडर ,सह सचिव  ए. के.  प्रेमचंद्रन, विश्वस्त  जोगेंद्र भाटिया , संचालक अँथनी स्वामी, व्यंकटेश ओलारी, आदि उपस्थितीत होते.              

कार्यकमाचे सुत्रसंचालन  शाळेच्या उप मुख्याधिपीका शर्मिला गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमा नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

YOUR REACTION?

Facebook Conversations