अत्याचारा ची गंभीर दखल घेतल्याने सर्वत्र दिलासा.

पुणे,देहूरोड दि.8 सप्टेंबर

  पुण्यात अल्पवयीन मुलीवर घडलेल्याअत्याचारीत घटनेची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेऊन गुन्ह्यातील नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा होईल असे ठोस दिलासाअत्याचारीत मुलीचे पालक नातेवाईक यांच्या सह राज्यातील जनतेला दिला आहे.त्या बद्दल ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनच्या वतीने ह्युमन राइट्स जस्टिस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तन्वीर मुजावर यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे. अजित दादांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात लागोपाठ घडलेल्या अत्याचार घटनेतील नराधमांना ही कठोरातील कठोर शिक्षा देण्याची तरतुद करावी. तसेच पुणे रेल्वे प्रशासनाने गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांना फक्त निलंबित केले आहे. रेल्वे स्थानकात आलेल्या प्रत्येक महिलेला सुरक्षा मिळवून देण्याचे त्यांना सहकार्य करण्याचे प्रत्येक रेल्वे कर्मचार्याचे आद्य कर्तव्य आहे.पुर्वीचे जेष्ठ कर्मचारी ते संस्कार पाळत आले आहेत.आता चे संस्कारहीन कर्मचारी बेताल वागणुकी मुळे असा लौकिक असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाला काळीमा फासणारे निंद्य कृत्य दोघा नराधमांनी केले आहे.त्यांना या पुढे रेल्वे सेवेत ठेवता कामा नये या साठी त्यांना रेल्वे सेवेतुन बडतर्फ करण्याची शिफारस रेल्वे राज्य मंत्री व रेल्वे महा प्रबंधक यांना करावी. अशी मागणी तनवीर मुजावर यांनी मांडली आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations