ह्युमन राइट्स जस्टीस असोसिएशन या मानवतावादी संघटनेच्या वतीने अन्नधान्य हक्क सोड उपक्रमां ला येत्या १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्या बद्दल निगडी अन्नधान्य परिमंडल अधिकारी दिनेश तावरे तावरे यांचा संघटनेचे राष्ट्रीयउपाध्यक्ष तनवीर मुजावर, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी सन्मान व आणखी २५संप्टेबंर पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी

निगडी

                    उच्च उत्पन्न शिधापत्रिका धारकांनी आपला अन्नधान्य हक्क सोड उपक्रमा ची मुदत ३१ऑगष्ट पर्यंत होती.ती मुदतवाढ येत्या १५ सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे. त्या बद्दल ह्युमन राइट्स जस्टीस असोसिएशन या मानवतावादी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी  निगडी परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांची भेट घेऊन संघटनेच्या वतीने पुष्प गुच्छ प्रदान करून अभिनंदन केले. व संघटनेच्या वतीने दिलेली मुदतवाढ येत्या २५संप्टेबंरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. या मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी पिंपरी विधान सभा प्रमुख शिवसेना नेते दीपक कांबळे उपस्थित होते.  

  या वेळी "गरिबांचा अन्नधान्याचा हक्क"  आणि "भारतातील कुपोषण"या वर दिलखुलास झालेल्या चर्चेत ह्युमन राइट्स जस्टीस असोसिएशन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी शासनाचा हा उपक्रम स्तुत्यआहे .या उपक्रमामुळे व कायद्याच्या बडग्या मुळे या पुढे गोरगरिब जनतेला आणि कुपोषित बालकांना त्यांचा हक्काचे "अन्नाचा घास" मिळेल. अशी भावना व्यक्त करून उच्च उत्पन्न शिधा पत्रिका धारक शिधा पत्रिकेवरील अन्नधान्य स्वतः न खाता त्याचा वापर ते आपले जनावरांसाठी खाद्य म्हणून करतात तर काही विक्री करतात तेच उच्च उत्पन्न शिधा पत्रिका धारक आम्हाला रेशन मिळत नसल्याची तक्रार मंत्रालया पर्यंत करतात अशी वस्तुस्थिती असल्याचा मुद्दा मुजावर यांनी उपस्थित केला. या वर उच्च उत्पन्न शिधा पत्रिका धारकांनी आपली मानसिकता बदलावी  व गोर गरिबांना त्यांचा हक्काचे अन्नाचा घास मिळावे या हेतुने हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे निगडी परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांनी सांगितले व या उपक्रमात उच्च उत्पन्न  शिधापत्रिका धारकांनी ३१ऑगष्ट पर्यंत अर्ज दाखल करून आपल्या  शिधापत्रिकेवरील अन्नधान्याचा हक्क सोडावा हा उपक्रम राबविण्यात आले.या उपक्रमाला मुदतवाढ देण्याचा मागणी केल्या मुळे शासनाने येत्या १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे दिनेश तावरे यांनी सांगितले. 

तेंव्हा तनवीर मुजावर, जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, चंद्रशेखर पात्रे यांनी सध्या गणेशोत्सव सुरवात आहे. उच्च उत्पन्न सिधा पत्रिका धारक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ज्यादा तर कोकणात अगर श्री गणेशाचे देवस्थान स्थळे असलेल्या स्थळांकडे जातात अशांना हा उपक्रम माहिती नसेल गणेशोत्सव साजरा करून येतात त्यांना या बाबत काहीही माहिती नाही. त्यांना माहिती देऊन त्यांच्या कडुन अर्ज भरून घ्यावे.या साठी येत्या २५संप्टेबंरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे. 

YOUR REACTION?

Facebook Conversations