नराधम सासऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल, पत्नी मुलगा घरात नसल्याचा फायदा घेत जीवे मारण्याची धमकी.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पुणे दि. ३० :- सुन म्हटले तर आपल्या पोरी सारखे सासरा म्हटले की ते वडिलां सारखे असे आपली संस्कृती आहे पण नराधम सासऱ्याने आपले तोंड सुने बरोबर काळे केले आहे. घरात कोणी नसताना सुने बरोबर लैंगिक शोषण करत "तुझे मेरे लिये ही लाया हू, तु मुझे खुश कर, मै तुझे खुश रखुंगा" असे म्हणत मुलगा आणि पत्नी घरात नसताना सासर्याने सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पुण्यातील धनकवडी तळजाई पठार परिसरातील ही घटना घडली सहकार पोलीस ठाण्यात या प्रकरणी ४७ वर्षे नराधम सासर्‍याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी २२ वर्षीय सुनेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे लग्न झाल्यापासून आरोपी सासरा हा तिच्यावर मुलीसारखे प्रेम करत असल्याचे नाटक सर्वान समोर करत होता. काही दिवसांपूर्वी फिर्यादीची सासू काही कामानिमित्त बाहेर राज्यात गेले होते तर पती देखील काही कामानिमित्त घरा बाहेर गेला होता. या वेळी आरोपीने संधी साधत तिच्या बेडरूम मध्ये प्रवेश करून तिच्या सोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला फिर्यादीने त्याला विरोध केला असता "तुझे मेरे लिये ही लाया है" म्हणत जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने तिच्यासोबत बलात्कार केला दरम्यान बदनामीच्या भीतीने फिर्यादीने याविषयी कोणाला सांगितले नाही याचाच फायदा घेऊन आरोपीने नंतर संधी साधून तीन वेळा फिर्यादीचे लैंगिक शोषण केले त्यानंतर फिर्यादी विषय कुटुंबीयांना चिथावणी देऊन तिच्याविषयी इतरांचे मन कलुषित केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक लोंढे करीत आहे.  

वृत्त संपादक अशोक कांबळे       

 बातमी व जाहीराती साठी🗣📲📞 {9767508972}  {7219500492} {9850826340}

YOUR REACTION?

Facebook Conversations