थाईलंड म्यानमार या बौद्ध देशातील दानशुर बौद्धा कडुन मुर्ती दान. येत्या ४ ऑक्टोबरला नागपूर दीक्षा भुमीत भुमीपुजन ,वंदनीय भन्ते सुरई ससाई यांच्या पुढाकाराने उपक्रम साकार होणार.

वृत्त संपादक अशोक कांबळे.

 धम्मभुमी देहूरोड :- महामानव विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना उघड्या नेत्रांचे बुद्ध मुर्ती आवडत असे म्हणुन विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातून बौद्ध धर्म लयास गेल्या नंतर सुमारे १२०० वर्षा नंतर भारतात सर्व प्रथम देहूरोड बुद्ध विहारात स्वहस्ते पहिल्या उघड्या नेत्रांचे बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करून भारतात बुद्ध धर्म पुनरुज्जीवन कार्याचा प्रारंभ केला.

 विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्म पुनरुज्जीवन कार्यारंभ देहूरोड बुद्ध विहार येथुन केल्याने देहूरोड धम्मभुमी संबोधले जाते. विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते स्थापना केलेली बुद्ध मुर्ती उघड्या नेत्रांचा आहे. सर्वत्र आज पर्यंत फक्त नेत्र मिटून ध्यानस्थ मुद्रेतील मुर्तीच आढळतात धम्मभुमी देहूरोड बुद्ध मुर्ती भारतातील पहिली बुद्ध मुर्ती आहे. 

 नागपूर दीक्षा भूमीतील बुद्ध मुर्ती ध्यानस्थ आहे. नागपूर नागलोक परिसरात या पुर्वी चलीत बुद्ध मुर्ती स्थापित केलेली आहे. आता विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनोकामना पूर्ण करण्यासाठी दीक्षा भुमीत चलीत बुद्ध मुर्ती स्थापित करण्यासाठी दीक्षा भुमी स्मारक समितीचे अध्यक्ष वंदनीय भन्ते सुरई ससाई यांनी पुढाकार घेतला आहे. वंदनीय भन्ते सुरई ससाई व एस के.गजभिये यांनी या साठी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 

थायलंड देशातील रविवान खनजनविसीता व म्यानमार देशातील फादर विंएगार या बौद्ध दानशुराच्या दानातुन चलीत ५० फुट उंचीची अष्टधातूची बुद्ध मुर्ती थाईलंड मध्ये घडविण्याचे काम मागील एक वर्षा पासुन चालू आहे. मुर्तीची काम पूर्ण झाल्या नंतर जहाजातून बुद्ध मुर्ती भारतात आणले जाईल. रस्ते मार्गावरून नागपूर दीक्षा भुमीत आणले जाईल. या बुद्ध मुर्तीची स्थापना करण्यासाठी नागपूर दीक्षा भुमीत येत्या ४ भुमीपुजन होत आहे. ५० फुटी उंच अष्टधातूची बुद्ध मुर्ती स्थापना करण्याचे योगदान थाईलंड देशातील बौद्ध प्रतिनिधी व थाईलंड देशाचे अभियंता यांचे असणार आहे.

•••••••••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी🗣📲📞. 

{9767508972}

{7219500492}

{9750826340}

•••••••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations