गाडी चालक यांची साक्ष ठरले म्हत्वाचे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या टिमने पीडितांच्या परिवाराला न्याय मिळवून दिल्याने सर्वत्र कौतुक व न्यायालयाचे नागरिकांच्या वतीने आभार प्रकट

पुणे दि. २७:- ६ मे २०१४ रोजी माणसाला काळीमा फासणारी घटना घडली होती एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिचा खुन करण्यात आला होता. तिचा मृतदेह बॅगेत भरून तळेगाव रेल्वे स्टेशन येथे टाकणार्‍या तिघांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश जे.जी.डोरले यांनी सुनावली. बलात्कार , खूनसह,फुस लावून पळवून नेणे, अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याच्या कलमाने शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती. राहुल रविंद्र बरई, जिशान ऊर्फ इशान हमझा अली कुरेशी,संतोष विष्णू जुगदर अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. वडाळा येथे राहणार्‍या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी २८ साक्षीदार तपासले. त्यामध्ये तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आरोपी ज्या गाडीतून गेले. त्या गाडीच्या चालकाची साक्ष महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वामन कोळी यांनी शिक्षेवर युक्तीवाद केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी केला. 

पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विष्णू साळेकर, हवालदार दत्तात्रय मोरे आणि नाईक निशांत कसबे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. जुगदर याने त्या मुलीला फुस लावून नालासोपारा येथील एका इमारतीमध्ये नेले. तिथे कुरेशी आणि बरई राहत होते. तिघांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिसांकडे करेल आणि आरोपींनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याची माहिती तिला झाल्याने तिचा खून करण्याचा कट रचला.

जुगदर याने तिला मारण्यासाठी बरई आणि कुरेशी यांना ७५ हजार रुपये दिले.

६ मे २०१४ रोजी हाताने आणि ओढणीने गळा आवळून तिचा खून केला.

तिचे हात बांधून मृतदेह बॅगेत भरण्यात आला. कॅबमधून ती बॅग दादर येथे नेण्यात आली.

तेथून स्कॉर्पिओ गाडीतून पुणे रेल्वे स्टेशनजवळील एस.टी.स्टॅण्ड येथे नेली.

तेथून रिक्षाने नेवून तळेगाव येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन येथे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने ती बॅग टाकून देण्यात आली होती.कठोर शिक्षा न्यायालयाने दिल्याने नागरिकांन मध्ये आनंद व्यक्त केला जात आहे तसेच या खुनाचे तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांचा टिमने केले व पीडितांच्या परिवाराला योग्य न्याय मिळवून दिल्याने पोलीसांचे देखील सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations