नाना काटे याच्या मार्गात बंडखोर उमेदवार राहुल कलाटेचे "काटे", बंडखोरी केली नसती तर चित्र वेगळे असते. राहुल कलाटे सोबत इतर २६ उमेदवाराचे ही डिपॉझिट जप्त झाले

 द जस्ट आज न्युज दि. ३ – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पिंपरी चिंचवड मतदारसंघात कोण किती मताने निवडून आले व इतरांना किती मत मिळाले नोटा मध्ये किती मत गेले, तर पक्षा मध्ये कुठे "खुशी* तर कुठे "गम" पाहण्यास मिळाले महा विकास आघाडीतील काटे- कलाटे यांची मत विभागणी फायदा भाजपाला असे चित्र समोर आले याचा निकाल पुढील प्रमाणे भाजपचे दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांची पत्नी उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना १,३५,६०३ मतदान मिळाले तर महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना ९९,४३५ एवढे मते मिळाली आहे. अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना ४४,११२ एवढे मतांवर समाधान मानावे लागले आहे.

पिंपरी चिंचवड या पोटनिवडणुकी मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २५ उमेदवारांना दोन आकडी किंवा फार-फार तर तीन आकडी मतांवर समाधान मानावे लागले आहे.२,७३० मतदारांनी सर्वच्या सर्व उमेदवारांबाबत नाराजगी प्रकट करत नापसंती नोंदविली आहे.

उमेदवाराचे नाव पक्षाचे नावे मिळालेली मते व टक्केवारी अशी आहे

१( अश्विनी लक्ष्मण जगताप भाजप १३५६०३,- ४७.२३टक्के

२) विठ्ठल उर्फ नाना काटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ९९४३५- ३४.६३ टक्के

३) राहुल कलाटे अपक्ष ४४,११२- १५.३६ टक्के

४) प्रफुल्ल मोटलिंग महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी ३७९-०.१३ टक्के 

५) मनोज खंडागळे आझाद समाज पार्टी १७४०- ०.०६ टक्के

६) तुषार लोंढे बहुजन भारत पार्टी १२२०- ०.०४ टक्के

७) अड. सतीश कांबिये बहुजन मुक्ती पार्टी ११५ - ०.०४ टक्के

८) अजय लोंढे अपक्ष १०६ ०.०४ टक्के

९) अनिल सोनवणे अपक्ष ४५ - ०.०२ टक्के

१०) अमोल सूर्यवंशी अपक्ष २५९ - ०.०९ टक्के

११) किशोर काशीकर अपक्ष ३१६ - ०.०११ टक्के

१२) गोपाळ यशवंत तंतरपाळे अपक्ष ४३९ - ०.१५ टक्के

१३) चंद्रकांत मोटे अपक्ष ४८- ०.०२ टक्के

१४) जावेद रशिद शेख अपक्ष ११३ - ०.०४ टक्के

१५) दादाराव कांबळे अपक्ष ३०५ - ०.०११

१६) बालाजी जगताप अपक्ष ३४० - ०.१२ टक्के 

१७) सुभाष बोधे अपक्ष ६६० - ०.१२ टक्के

१८) डॉ. मिलिंदराजे भोसले अपक्ष २७६ - ०.१ टक्के

१९) मिलिंद कांबळे अपक्ष ९७- ०.०३ टक्के

२०) मोहन म्हस्के अपक्ष ८२- ०.०३ टक्के

२१) रफिक कुरेशी अपक्ष १८४ - ०.०६ टक्के

२२) राजू उर्फ रविराज काळे अपक्ष १२१- ०.०४ टक्के

२३) सोयलशहा शेख अपक्ष ७४- ०.०३ टक्के

२४) श्रीधर साळवे अपक्ष ३१६- ०.११ टक्के

२५) सतीश सोनवणे अपक्ष ४९ - ०.०२ टक्के

२६) सिद्दीक शेख अपक्ष ३९८ - ०.०१४ टक्के

२७) सुधीर लक्ष्मण जगताप अपक्ष ११२- ०.०४ टक्के

२८) हरीश मोरे अपक्ष ११७- ०.०४ आणी नापसंती असलेले २७३१०- ०.९५ टक्के असे

एकूण २८७,१२८ १०० झालेल्या एकूण २,८७,१२८ मतदानापैकी ४७.२३ टक्के मते मिळवून भाजपच्या अश्विनी जगताप यांनी विजयश्री खेचून आणली. महाविकास आघाडीच्या नाना काटे यांना ३४.६३ टक्के तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना १५.३६ टक्के मिळाले आहेत. 

याचाच अर्थ असा की, जगताप यांच्या विरोधात ५२.७७ टक्के मते नोंदविली गेली, मात्र ती विभागली गेल्यामुळे जगताप निवडून आल्या. काटे आणि कलाटे यांच्या मिळालेल्या मतांची टक्केवारी एकत्र केली तर ती ४९.९९ म्हणजेच जवळजवळ ५०℅ टक्के होते. महाविकास आघाडीला बंडखोरी टाळण्यात यश आले असते, तर कदाचित वेगळा निकाल लागू शकला असता, असे आकडेवारीच्या विश्लेषणावरून दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली खर तर ही पोटनिवडणूक राज्यातील सत्तासंघर्ष सत्ता वर्चस्वाची निवडणूक होती या निवडणुकीत सर्वाची प्रतिष्ठेची होती म्हणून महायुतीचे ४० तर महा विकास आघाडीचे २० पेक्षा अधिक स्टार प्रचारक तसेच राज्यातील आमदार खासदार मंत्री या मतदारसंघात तळ ठोकून बसले होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्व शरदचंद्र पवार, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार या सगळ्यांनी प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसुन आले. खर तर या पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांच्या बंडखोरी मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे ना बसल्याचे चर्चा आहे या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या अश्विनी जगताप, महा विकास आघाडीच्या नाना काटे, आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत भाजपा उमेदवार अश्विनी जगताप निवडून आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले या विजयाचे सर्व श्रेय पक्षाच्या कार्यकर्ताना देत दिवंगत लक्ष्मण जगताप यांना समर्पित केले या पुढे मी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांचे राहीलेले स्वप्न पूर्ण करणार असल्याचे ही अश्विनी जगताप यांनी सांगितले. या पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचा डिपॉझिट गुल झाले आहे तर महाा विका आघाडीला दिलासा मिळालेेलेचे चित्र आहे डिपॉझिट खाण्यासाठी निवडणूक आयोगानुसार एकुण मतदानाचा १/६ टक्के म्हणजे १६.६६ टक्के मते मिळविणे गरजेचे असते राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते मिळाली त्यांना आपले डिपॉझिट राखण्यासाठी ४७ हजार ८३३ एवढे मत मिळणे आवश्यक होते त्यामुळे राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे राहुल कलाटे सोबत २६ उमेदवाराचे ही डिपॉझिट गुल झाले आहे. 

YOUR REACTION?

Facebook Conversations