पत्रकार परिषदेत दिली ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली माहिती या प्रकरणात एक महिलेचा ही समावेश

पुणे दि. २५ :- दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळून आल्याने पुणे जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच त्याला वेगळे वळण मिळाले. पत्रकार परिषदेत ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या हत्या बाबतची धक्कादायक माहीती देताना दिली त्यांच्या ४ चुलत भावानींच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून या मध्ये एका महिलेचा समावेश आहे, 

मोहन उत्तम पवार वय वर्ष ४५, संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार वय वर्ष ४० दोघे रा. खामगांव ता. गेवराई जि. बीड, त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे वय वर्ष २८ त्याची पत्नी राणी शामराव फुलवरे वय वर्ष२४ त्यांचा मुलगा रितेश उर्फ भैय्या शामराव फुलवरे वय वर्ष ७, छोटू फुलवरे वय वर्ष ५, कृष्णा वय वर्ष ३ सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद अशी मृत्यू झालेल्या सात जणांची नावे आहेत. याप्रकरणी अशोक कल्याण पवार वय वर्ष ३९, शाम कल्याण पवार वय वर्ष३५, शंकर कल्याण पवार वय वर्ष ३७, प्रकाश कल्याण पवार वय वर्ष २४, कांताबाई सर्जेराव जाधव वय वर्ष ४५ सर्व रा. ढवळेमळा निघोज ता. पारनेर, जि. अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सगळे आरोपी हे एकमेकांचे भाऊ बहिण आहेत. या हत्याकांडामुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 

सूडाच्या भावनेतून हे कृत्य केले. 

 मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यापूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा येथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. धनंजय हा हॉस्पिटलमध्ये असतानाही मोहन पवार व त्याच्या मुलाने ही बाब सांगितली नाही. चार दिवसांनी धनंजयचा अपघात झाल्याची माहिती चुलत भावांना समजली. त्यानंतर धनंजय पवार यांचा मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना होता. त्याचा राग मनात धरुन हे हत्याकांड करण्यात आले आहे.

अशी केली हत्या. मोहन आणि त्यांचे कुटुंबीय १७ जानेवारी रोजी भीमा नदी जवळ अल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांना आडवले. त्यांनी मोहन पवार, त्याची पत्नी, मुलगी, जावई आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांना बेशुद्ध केले. सर्वजण बेशुद्ध झाल्यावर त्यांना भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात फेकून देण्यात आले. पाण्यात बुडाल्याने सात जणांचा मृत्यू झाला.

पोलीसांचा दुजोरा, अंधश्रद्धेतून हत्याकांड नाही

दरम्यान, हे हत्याकांड अधश्रद्धेतून झाला असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. पोलीसांनी ताबडतोब चक्रे फिरिविल्याने आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे हे हत्याकांड अंधश्रद्धेतून झाले आहे का याचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथकं तपास करीत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.

ही उत्तर कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,उप विभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग राहुल धस यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर , पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिवाजी ननवरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, हनुमंत पासलकर, मुकुंद कदम, काशीनाथ राजापुरे,पोलीस अंमलदार सचिन घाडगे, राजु मोमीन, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे,विजय कांचन, चंद्रकांत जाधव, प्रमोद नवले, निलेश शिंदे, धिरज जाधव, मंगेश भगत, तुषार भोईटे, अमोल शेडगे,दगडु विरकर, अक्षय सुपे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे,पोलीस अंमलदार निलेश कदम, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव, अजित काळे, प्रमोद गायकवाड,यांच्या पथकाने केली. हत्याचे तपास अतिशय जलद गतीने करून आरोपींना गजाआड केल्याने पोलीसांचे नागरिक कौतुक ही करत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations