दोन्ही डाॅक्टरांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी. शिपाई ने वडगावशेरीतुन स्विफ्ट कार मध्ये तीन लाख रुपये आणल्याचे उघड.

पुणे : ससुन रुग्णालय आहे कि गुन्हेगारांना वाचविण्याचा अड्डा? असे प्रश्न उपस्थित झाले आहे कल्याणीनगर दुहेरी बळी प्रकरणी  अल्पवयीन मुलाच्या रक्त तपासणीच्या अहवालात फेरफार  केल्याबाबत पुणे पोलिसांच्या  गुन्हे शाखेने  ससून रुग्णालयातील डॉ.अजय तावरे  आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनविले आहे. 

त्यांनतर आता या डॉक्टरांना पैसे पोहोचवण्यासाठी मदत करणाऱ्या ससून रुग्णालयाच्या शिपायाला देखील अटक

करण्यात आली आहे. अमित घटकांबळे असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव असून तो ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात काम करतो.

वडगाव शेरीतून स्विफ्ट कारमधून तीन लाख रुपये तो घेऊन आला असल्याचे तपासात उघड झाले आहे .

याबाबत आता त्याला न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations