सर्व समाजा नी एकत्र येऊन आंबेडकरी चळवळ पुढे न्यायला हवी:- प्रभाकर निकम
धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्थेच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील अग्रणी व कृतिशील नेतृत्व प्रभाकर निकम यांच्या वाढ दिवसा निमित्त विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार शिल्पा समोर सन्मान

देहूरोड :

   आंबेडकरी चळवळ विखुरलेले आहे. सर्वांनी एकत्रित येऊन आंबेडकरी चळवळ पुढे न्यायला हवी असे अवाहन मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन या संघटनेचे राष्ट्रीय जन संपर्क प्रमुख, विकासक ,बुद्ध ,भीम गायक प्रभाकर निकम यांनी त्यांच्या सन्मानाला उत्तर देताना केले. प्रभाकर निकम पुढे बोलताना म्हणाले धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार शिल्पा समोर माझा केलेल्या सन्माना मुळे मला स्फूर्ती, उर्जा मिळाली. मी मुंबईत असताना चळवळीचे जे बळ होते ते मला देहूरोड मध्ये मिळाले. त्यामुळे मी भाग्यवान आहे. असे ही मत प्रभाकर निकम यांनी व्यक्त केले. प्रारंभी सन्मानार्थी प्रभाकर निकम यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग फलकावरील

विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रतिमेस पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले. सन्मानार्थी प्रभाकर निकम यांचा धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्थेचे समन्वयक अमोल नाईकनवरे व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमणी यांच्या हस्ते पंचशील उपरणे,असंघटित कामगार नेते दिपक चौगुले यांच्या हस्ते प्रवेशद्वार अहवाल प्रदान करून सन्मान करून गौरविण्यात आले. रिपब्लिकन धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष के.एच.सुर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आपण आज आंबेडकरी चळवळ कृतीने वाहुन नेणारे तसेच. आंबेडकरी चळवळीतील उपक्रमात 

 सहभाग घेऊन ते यशस्वी करण्यासाठी अमोल योगदान देणारे सन्मानार्थी प्रभाकर निकम यांच्या वाढदिवसा निमित्त विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार शिल्पा समोर संस्थेच्या उपक्रमांतर्गत संस्थेच्या वतीने त्यांच्या वाढ दिवसा निमित्त सन्मान सोहळा होत आहे . . सन्मानार्थी प्रभाकर निकम यांनी गेल्या संविधान दिन कार्यक्रमांचे निमंत्रक म्हणून कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्वाचे योगदान दिले. त्याच प्रमाणे या वर्षी ही संविधान दिन भव्य दिव्य यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे. अशी अपेक्षा केली. एच. सुर्यवंशी यांनी व्यक्त केली. 

या वेळी जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, युवा नेते अमोल नाईकनवरे, प्रवक्ते प्रकाश कांबळे, परशुराम दोडमणी यांनी प्रभाकर निकम यांचा मानवतावादी कार्याचा गौरव करून भावी उदंड कार्याचा व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. प्रभाकर निकम यांनी वाढ दिवसाचा केक कापला उपस्थित मान्यवरांनी एक मेकांना भरवुन वाढ दिवसाचा आनंद द्विगुणित केला. प्रभाकर निकम भीम गीत गायनात प्रसिद्ध असलेल्या उपस्थित सर्वांनी त्यांना या गोड क्षणी तुमच्या पहाडी आवाजातील एखादा भीम गीताचे कडवे सादर करा .असा आग्रह धरला.तेंव्हा सर्वांच्या आग्रहा खातर प्रभाकर निकम यांनी तुला भीमा ने बनवले वाघ तु उगाच का फिरतो लांडग्या माग हे भीम गीत गाऊन उपस्थितांची वाहवा मिळवली. 


या आनंदमयी कार्यक्रमांत मानव आधार सामाजिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेटकर, उद्योजक समीर भोंडवे, सामाजिक नेते थॉमस जोसफ, सामाजिक नेते भिमराव चालवादी ,धर्मपाल कांबळे या मान्यवरांनी सन्मानार्थी प्रभाकर निकम यांना केक भरवुन वाढदिवसा च्या शुभेच्छा दिल्या

YOUR REACTION?

Facebook Conversations