सार्वजनिक येणाऱ्या जाण्याऱ्या गर्दी च्या ठिकाणी हातात चाकु घेऊन आरोपीचे दहशत.

  

देहूरोड दि.०२:- तडीपारीचा आदेश भंग करत हातात चाकु घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंडाला देहुरोड पोलीसांनी अटक केले आहे.

आदेश भंग करून आलेल्या कुणाल वाल्मिकी वय २६ वर्षे रा. श्रीकृष्ण नगर, एम बी कॅम्प, देहूरोड पुणे असे नाव असलेल्या तडीपार असणाऱ्या आरोपीस देहुरोड पोलीसांनी दिनांक २८ सप्टेंबरला दुपारी ३.३० वा च्या सुमारास अटक करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२, भारतीय शस्त्र कायदा ४(२५), क्रिमिनल कायदा ॶॅक्ट ७ प्रमाणे देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उप-आयुक्त परिमंडल दोन, पिंपरी चिंचवड यांनी ३० जुलैला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे जिल्ह्यातील हद्दीतून दोन वर्ष कालावधी करिता ३ ऑगस्ट २०२२ ते २ ऑगस्ट २०२४ पर्यंत त्याला तडीपार करण्यात आले होते. तडीपार असतानाही त्याने न्यायालयाची किंवा पोलीस उप-आयुक्त, परिमंडल दोन देहूरोड पोलीस यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात विकास नगर शिंदे पेट्रोल पंपा समोरील सार्वजनिक रोड वर चाकू हातात घेऊन मोठ्याने ओरडून तेथील लोकांमध्ये दहशत निर्माण करताना दिसला. त्यामुळे देहूरोड पोलीसांनी तडीपार असणाऱ्या आरोपीस वरील कलमाखाली अटक केले. 


••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी🗣📲📞. 

{9767508962}

{7219500492}

{9850826340}

••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations