सोन्या पानसरेनेच केला सोन्या तापकीरचा गेम मित्रानेच केला मित्राचा गोळी झाडून खून.
भर चौकात गोळ्या घालून खुन करून आरोपी पसार परिसरात खळबळ.


पिंपरी दि. २२ :- पुणे सह पिंपरी-चिंचवड परिसरातील खुनाचे सत्र काही थांबेना तळेगाव,कामशेत शिरगांव येथील खुनाची घटना ताजे असताना आज चिखली येथे एकाचे गोळी झाडून खून करण्याची घटना घडली आहे , चिखली चौकात आज (सोमवार) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास युवकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 

मात्र, आत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे मयताच्या मित्रानेच मित्राची ‘गेम’ केली आहे. खूनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय वर्ष ३०, रा. महादेव मंदिराजवळ, चिखलीगाव, पुणे असे खून झालेल्याचे नाव आहे. चिखली पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या तापकीरचा खून त्याचा मित्र सौरभ उर्फ सोन्या पानसरे (रा. मु.पो. मोई, ता. खेड, जि. पुणे) आणि त्याचा साथीदार सिध्दार्थ कांबळे यांनी केला आहे. पानसरे आणि कांबळेने आज दुपारी पावणे दोन वाजता कोणत्यातरी अज्ञान कारणावरून सोन्या तापकीरची भर चौकात गोळ्या घालून गेम केली आहे.

याप्रकरणी चिखली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, सोन्या तापकीरची गेम सोन्या पानसरेने वाजविल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अद्यापही खूनाचे नेमके कारण समोर आलेले नाही. चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर 

यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलिस आणि पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations