आरोपी पळाल्याने पुणे पोलीस दलात खळबळ ही दुसरी घटना, यापूर्वी ड्रग्स माफिया ललित पाटील यांनी ही असेच पळ काढला होता.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 पुणे दि. सायबर गुन्ह्यांत अटक केलेल्या आरोपीने पुणे पोलीसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातून पलायन केले मार्शल लुईस लीलाकर (राहणार आकुर्डी) असे पळ काढलेल्या आरोपीचे नाव आहे  काहीच महिन्यांपूर्वी ड्रग्स माफिया ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन असाच पसार झाला होता. आरोपी लीलाकर पळाल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर ला दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांंनी अटक केली होती. 

सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ याला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी मार्शल लीलाकारला अटक केली होती. लीलाकर यांनी अश्लिल शिवीगाळ, कमेंट प्रकरणी त्याच्यावर सायबर पोलीस ठाण्यात ५००,५०६,५०९ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ अन्वये गुन्हा दाखल होता पुणे पोलीसांनी त्याला अटक केली होती. 

आज पहाटेच्या सुमारास लीलाकरने छातीत दुखत असल्याचा बाहाणा केला. त्यामुळे  येरवडा जेलमधून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. फरार असलेल्या मार्शल लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी आठ पथके पाठवली असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहे.

काही दिवसांपूर्वी  शरद मोहोळची कोथरूड परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पत्नी स्वाती मोहोळला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. या प्रकरणी स्वाती मोहोळने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मार्शल लीलाकर याला अटक केली होती.

 शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकावणारा आरोपी लीलाकर याने ससून रुग्णालयातून पळ काढल्याने त्याला पकडणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

हाच तो आरोपी मार्शल लुईस लीलाकर.

हाच तो आरोपी मार्शल लुईस लीलाकर.

YOUR REACTION?

Facebook Conversations