मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी जबाबदारी, मावळ सहीत पिंपरी चिंचवड मध्ये आनंदाचे वातावरण, दिलेली जवाबदारी पुर्णपणे करीन पक्ष संघटना बळकट करीन :- श्रीरंग आप्पा बारणे.
647
views

द जस्ट आज वृत्त दि. १६ :- मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकत  शिवसेना उपनेते पदाची माळ महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकली बारणे यांच्या उपनेते पदाची नियुक्ती झाल्याची वार्ता कळताच मावळ सहीत पिंपरी चिंचवड शहरात कार्यकर्त्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक स्तरावरून शुभेच्याचे वर्षाव होत आहे त्यांच्या वर पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्याने जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर, पिंपरी विधानसभाप्रमुख राजेश वाबळे, सरिता साने, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, अंकुश देशमुख, सुरेश राक्षे, प्रदिप दळवी, दीपक गुजर, विलास जगदाळे, नंदू जाधव, माऊली जगताप, निलेश हाके, राजेंद्र तरस, प्रशांत कडलक, रोहित माळी, शैला पाचपुते, शैला निकम, बशीर सुतार, रुपेश चांदिरे, पोपटराव चौधरी, जयसिंगराव मगर, सुरेक्ष राक्षे, गणेश खानेकर, हेमचंद्र जावळे, अंकुश कोळेकर, मयुरी सावंत, रवींद्र ब्रह्म, दत्ता रसाळ, संभाजी काळभोर आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे अनेक वर्षांपासून समाजकारण, राजकारणात आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत मागील २५ वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. स्थायी समितीचे अध्यक्ष असताना शहराचा नियोजनबद्ध विकास केला. व २०१४ मध्ये शिवसेनेकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे लोकसभेत गेले. पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत ही सलग दुस-यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी होत श्रीरंग बारणे यांनी संसद गाठली. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मागील सात वर्षे सलग संसदरत्न, महासंसदरत्न, विशिष्ट संसदरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. आता पक्षाने त्यांच्यावर संघटनेची मोठी जबाबदारी सोपविली आहे. शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करत खासदार बारणे यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नेमणूक झाली आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारच्या योजना शिवसैनिकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविल्या जातील. जनतेला, शिवसैनिकांना सत्ताचा फायदा मिळवून दिला जाईल. शिवसैनिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशिल राहील. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेला हा विश्वास सार्थ करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन”. असे विश्वास पणे त्यांनी माध्यमातून सांगितले आहे श्रीरंग बारणे याची उपनेते पदी नियुक्ती झाल्याने मावळ सहीत पिंपरी चिंचवड मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

••••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी🗣📲📞

{9767508972}

{7219500492}

{9850826340}

••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations