विविध संस्था, संघटना, सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सेवा भावी सेवेचा गौरव.

पुणे :

                                         पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील  कोरोना महामारीच्या काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता  रूग्ण सेवेचे कर्तव्य बजावलेल्या  सेवा भावी कोरोना योद्धा सेवक  अशोकराव  वाघमारे यांच्या शासकीय  सेवा पुर्ती निमित्ताने दि. २८ऑक्टोबंर पासून  ते आज तगायत अशोकराव  दादा वाघमारे यांच्या वर शुभेच्छांचा  वर्षाव सुरू आहे.

                अशोकराव वाघमारे  यांच्या  सेवा पुर्ती निमित्ताने २८ ऑक्टोंबर रोजी डाॅ.नायडू संसर्गजन्य रूग्णालयात रुग्णालयातील  सेवक ,सेविका . अधिसेविका अधिकारी यांच्या उपस्थितीत  रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रा. डाॅ. सुधीर पाटसुते, डाॅ. विवेकानंद  जाधव  यांच्या हस्ते  अशोकराव  दादा वाघमारे  व त्यांच्या सहचारिणी  संगीता नानी वाघमारे  यांचा शाल, पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव करण्यात आला. या सोहळ्यात  धम्मभुमी देहूरोड बुद्ध विहार कृती  समितीचे अध्यक्ष टेक्सास  दादा गायकवाड,  आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विजय पवार  उपस्थित होते.

                       दि .३० ऑक्टोबंरला देहूरोड  येथील निवासस्थानी आयोजित गौरव सोहळ्यात प्रारंभी अशोकराव दादा वाघमारे त्यांची सहचारिणी संगीता नानी वाघमारे  या समाजव्रती धम्म व्रती दांपत्याच्या पुणे  नायडू रुग्णालयातील  वैद्यकीय अधिकारी डाॅ. भारतभर, डाॅ. पोटेसर,  डाॅ. सोनकांबळे यांनी शाल पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव केला. त्या नंतर पुणे महानगरपालिका आरोग्य  विभागातील अधिकारी, सेवक वर्ग   आणि  देहूरोड परिसरातील  विविध  संस्था, संघटना चे नेते  , कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करून गौरव केला.

               ३१ऑक्टोबंर ला पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या वतीने कामगार अधिकारी  यांनी  अशोकराव  वाघमारे  यांचा  गौरव  केला.   दि. २८ऑक्टोंबर पासुन ते आता  पर्यंत  अशोकराव दादा वाघमारे यांच्या  सेवा भावी रूग्ण  सेवे बद्दल सर्व  क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या  सेवा  पुर्ती  बद्दल  त्यांचा गौरव  करीत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations