रहदारीच्या ठिकाणी भर दिवसा रोडवर तरूणाचा गोळ्या घालून हत्या.
भरदिवसा गोळी झाडून हत्या झाल्याने नागरिकांन मध्ये घबराट, कायदा सुव्यवस्था वर प्रश्न चिन्ह निर्माण.

                   

 पुणे दि. २२:- पुण्या ते लोणावळा दरम्यान  खुनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. शिरगांव येथील सरपंच, किशोर आवारे व कामशेत येथे एका तरूणाचे रेल्वे स्थानक लगत दगडाने टेचुन हत्या करण्यात आले हे हत्याप्रकारण ताजे असतानाच आता चिखली येथे भर दिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. 

सोन्या तापकीर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिरगाव सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दिवसा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.त्यांनतर पुन्हा एक खुनाची गंभीर घटना समोर आली आहे. चिखली गाव येथे सोन्या तापकीर याच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. ही घटना भर दिवसा रहदारीच्या मार्गावर घडली. गंभीर जखमी झालेल्या तापकीर याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

यामुळे कायदासुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होतच असून बंदूक आणि कोयत्याचे वाढते साम्राज्य यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे मोठी समस्या निर्माण झाली आहे. असे हत्या होत असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेच आहे पुण्याचा बिहार होत चालल्य का? असे नागरिकांन मध्ये चर्चा सुरू आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations