किवळे, रावेत, विकासनगर, साईनगर, मामुर्डी हे परिसर गरज नसताना ही २००० यार्ड रेडझोन क्षेत्र जाहीर केले तो निर्णय ताबडतोब रद्द करा.

 देहूरोड दि.१७ :- फुले शाहु आंबेडकर विचार मंचच्या वतीने रेडझोन हटाव देहूरोड बचाओ म्हणत रेडझोनच्या विरोधात येत्या १९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता देहूरोड सवाना उपहार गृह पासुन ते आयुध निर्माण केंद्र गेट देहूरोड येथे धडक मोर्चा फुले शाहू आंबेडकर मंचच्या वतीने काढण्यात येणार आहे. रावेत, किवळे, विकासनगर, सह दिघी, भोसरी, मोशी, चिखली, वडमुखवाडी, तळवडे, निगडी, हा भाग मोठ्या प्रमाणात रेडझोन बाधित झाले आहे त्यामुळे रेडझोनचे टांगती तलवार सर्व सामान्यांचे झोप उडविले आहे. आज अनेक लोक एक एक पैसा जमा करून आपल्या पोटाला चिमटा घेऊन जमीन, फ्लॅट, घरे घेतले आहे तर काही बिल्डर लोकांनी गगनचुंबी इमारत उभी केली आहे रेडझोन जाहीर झाल्याने घरांचे किमती ही घसरले आहे, या रेडझोनमुळे अनेक लोक संकटात सापडले आहेत पण संरक्षण खाते ने देहूरोड रेडझोनची सीमा २००० यार्ड केल्याने अनेक लोक रेडझोन बाधित होणार आहे कारण निगडी, रावेत, किवळे, विकासनगर, मामुर्डी,साईनगर हे पूर्णता रेडझोनच्या क्षेत्रात आले आहे देहूरोड आयुध निर्माण डेपो च्या संरक्षण भिंती पासून २ हजार यार्ड अर्थात १.८२ किलोमीटर क्षेत्र रेडझोनच क्षेत्र घोषित केल्याने  याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना अधिक बसणार आहे. 

रेडझोनच्या बाबत १० नोव्हेंबर रोजी बोर्ड ऑफ ऑफीसर्स यांची देहूरोड येथे बैठक झाली होती. या रेडझोन बाबत मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी संसदेत लक्षवेधी भुमिका मांडली व रेडझोन कमी करण्याची मागणी केली. २०१३ मध्ये रेडझोन जाहीर झाले, पण या बाबत लोकांनी ही गाफील राहुन चालणार नाही रेडझोनचा भस्मासुर डोक्यावर बसले आहे रेडझोन हटाव देहूरोड बचाओ साठी फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने फुले शाहू आंबेडकर मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश आंदोलन व धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. 

या रेडझोन हटाव साठी फुले शाहू आंबेडकर मंचच्या वतीने लोकांना आवाहन करण्यात आले आहे कि येत्या १९ जानेवारी २०२३ गुरुवारी रोजी ठिक सकाळी ११ वाजता या भव्य दिव्य मोर्चात रेडझोन हटाव साठी सर्वानी सहभागी होऊन रेडझोन चा विरोध करणे आवश्यक आहे असे फुले शाहू आंबेडकर मंचाचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी जाहीर पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.

 या रेडझोन जन आक्रोश मोर्चाला ह्युमन राईट्स जस्टीस असोशिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर जिल्हा सरचिटणीस यांनी पाठिंबा दिला आहे तनवीर मुजावर यांनी रेडझोन है सर्व सामान्याचा प्रश्न आहे असे वेळी गट तट पक्षपात सोडून सर्वानी बहुसंख्येने एकजूट होऊन रेडझोनचा विरोध केला पाहिजे असे पाठिंबा देताना मुजावर बोलत होते.  अनेक सामाजिक संघटनेने या बाबत पाठिंबा दर्शवला आहे अनेक लोकांचे जीवाळच्या प्रश्न असल्याने हा मोर्चा दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी ठिक ११ वाजता सवाना उपहार गृह जुने मुंबई पुणे रोड येथुन मुंबई पुणे मार्गावरून देहूरोड  आयुध निर्माण डेपो येथे धडकणार आहे अशी माहिती फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी जाहीराती पत्रका द्वारे केले आहे अधिक माहिती साठी नागरिकांनी ९८२२४७५६९६ या क्रमांकावर संपर्क साधा असे म्हटले आहे. 

बातमी व जाहीराती साठी संपर्क. 

{9767508972}

 {7219500492} 

{9850826340}

YOUR REACTION?

Facebook Conversations