मागील अनेक वर्षापासून हद्द कमी करण्याऱ्या लोकांन वर अन्याय होईल, हद्द वाढीचा प्रस्तावित निर्णय तत्काळ मागे घ्या. निर्णय मागे न घेतल्यास अनेक लोक बाधित होणार,

 द जस्ट आज वृत्त दि. १४ :- रेडझोन ची मर्यादा कमी करण्यासाठी देहुरोड पिंपरी चिंचवड तळवडे येथील नागरिकांनी वेळोवेळी विविध अंदोलन केले पण नागरिकांचा थोडे ही विचार न करता संरक्षण विभागाने रेडझोन ची मर्यादा २००० यार्ड पर्यंत केल्याचे माहीती समोर येत आहे या बाबत मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या बाबत संसदेत जोरदार मागणी करत वाढवलेल्या रेडझोन कमी करावा अशी आग्रही खासदार श्रीरंग आप्पा बारणे संसदेत केली आहे. 

 देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या संरक्षण क्षेत्राची वाढविलेले २०००रेडझोन यार्ड हद्द कमी करण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या सदस्यांनी स्थानिक लोकांच्या कोणत्याही विचार न करता वेगवेगळी मते दिली आहेत. त्यानुसार २००० यार्डा पर्यंतची हद्द कायम करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. २००० यार्ड पर्यंत हद्द केल्यास निम्मे पिंपरी चिंचवड शहर रेडझोन बाधित होईल त्यामुळे २००० यार्ड ची यार्डची हद्द कायम करण्याच्या प्रास्ताविक निर्णय तत्काळ रद्द करावा स्थानिक लोकप्रतिनिधी राज्य सरकार यांची एकत्रित बैठक घ्यावी चर्चा करूनच पुढील कारवाई करावी अशी जोरदार मागणी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी लोकसभेत केली. 

खासदार बारणे म्हणाले मावळ लोकसभा मतदारसंघातील देहुरोड दारूगोळा कारखान्यात संरक्षण विभागाची १९८२ पासून पायरो टेक्नॉलॉजी जसे १६ एम एम १५५ की स्मोक आणि सैनिकांसाठी महत्त्वाची सामग्री सिग्नलिंग यंत्रे निर्माण केले जातात या कारखान्यात अतिस्फोटक निर्माण केले जात नाही या भागात जोडून संरक्षण विभागाच्या इमारतीसह तेथील अधिकाऱ्यांची निवासस्थान, कार्यालय, शाळा, रुग्णालय, येण्या जाण्याचा मार्ग, देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तलवडे आयटी पार्क, पीएमआरडीए चे क्षेत्र आहे. या भागात अनेक वर्षांपासून सुमारे पाच ते सहा लाख लोक वास्तव्यात असून महापालिका पीएमआरडी ते देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने अनेक गृह प्रकल्पांना मान्यता दिली आहे अनेक वर्षापासून या भागात मोठ्या इमारती असून लोकांचे वास्तव आहे या भागात रस्ते पाणी वीज या सुविधा दिल्या आहेत संपूर्ण भाग संरक्षण विभागाच्या ही नाही सुरुवातीला संरक्षण विभागाचा सीमा भिंतीपासून रेडझोन ची हद्द ५०० यार्ड पर्यंत होती परंतु २०१३ मध्ये ती अचानक २००० यार्ड पर्यंत वाढविण्यात आली वाढविलेला हद्द कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विविध पक्ष संघटनेने अनेक अंदोलन अनेक वर्षांपासून करत आहेत. 

अनेक वेळा संरक्षण विभागाला अनेक पत्र व्यवहार करण्यात आले आहे तसेच कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कडे ही पत्र व्यवहार करण्यात आले तसेच मानव आधार संघटना, ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन च्या वतीने पत्र व्यवहार ही केले आहे अनेक पक्ष संघटनेने माझ्या कडे वारंवार विनंती देखील केले आहे. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे २००० वरून ५०० यार्ड हद्द करण्यात तत्कालीन संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर, निर्मला सीतारामन, आत्ताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत अनेक वेळा बैठका झाल्या त्यानंतर संरक्षण विभागाने एक समिती गठन केली होती समितीच्या सदस्यांनी स्थानिक लोकांच्या कोणताही विचार न करता वेगवेगळ्या मते दिली आहेत त्यामुळे रेडझोन बाधित मुळे भविष्यात स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. सरंक्षण विभागाने २००० हद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. या संरक्षण प्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने हस्तक्षेप करावा दोन हजार यार्ड पर्यंत हद निश्चित केल्यास अर्धे पिंपरी चिंचवड शहर अनेक रहिवासी इमारती रेडझोन हद्दीत येतील, त्यामुळे भविष्यात येथे कोणत्याही विकास होणार नाही मागील अनेक वर्षापासून हद्द कमी करण्याची मागणी करणाऱ्या लोकांवर मोठा अन्याय होईल त्यामुळे २००० यार्ड पर्यंत ची कायम करण्यात येणारा हद्द वाढीचा प्रस्तावित निर्णय तत्काळ रद्द करावा अशी आग्रही मागणी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी संसदेत केली आहे. 

 बातमी व जाहीराती साठी संपर्क. {9767508972}

{7219500492}

{9850726340}

YOUR REACTION?

Facebook Conversations