रामभाऊ वडेवाले कडे खवय्यांची तोबा गर्दी

देहुरोड, दि.12जुलै

देहूरोड :- पुण्यात जसे प्रसिद्ध जोशी वडेवाले आहेत.तसेच देहूरोड मध्ये प्रसिद्ध रामभाऊ वडेवाले आहेत. रामभाऊ कर्डिले यांचे लातुर हे गाव नसीब अजमिवण्यासाठी १९६९ साली देहूरोड ला आले. काम धंदा शोधण्याचा प्रयत्न केला. पण म्हणावे तसे मंजुरी मिळत नसे रामभाऊ कर्डिलें खाद्य पदार्थ बनविण्यात तरबेज होते. नोकरी मिळत नसल्याने निराश न होता त्यांनी स्वतः चे रोजगार उभा करण्याचा निश्चय केला. व एक छोट्या हातगाडीवर त्यांनी माफक दरात देहूरोड स्वामी विवेकानंद चौकात हातगाडी लावुन वडा पाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. देहूरोड स्वामी विवेकानंद चौक देहूरोड महामार्गावर असलेला प्रमुख चौक असल्याने देहूरोड परिसरातील सकाळी मंजुरी शोधण्याचा प्रमुख ठिकाण व शेजारीच झाडु बनविणारे व्यवसायिकांचे शिवाजी नगर वसाहत असल्याने सकाळचा नाश्ता करण्यासाठी श्रमिक मंजुर व महिला पुरुष झाडु व्यवसायिकांची गर्दी वाढु लागली. थोड्याच अवधीत खमंग चवीचे रामभाऊ वडेवालेंचे वडा पाव साठी हातगाडीवर गर्दी वाढू लागली. रामभाऊ चे कष्टाचे चीज झाले. व्यवसायात प्रगती झाली .देहूरोड उड्डाणपूल निर्मिती च्या वेळी प्रशासनाने महामार्गावरील सर्व हातगाड्या हटविले. त्यात रामभाऊ नी स्वतः हुन आपली हातगाडी हलवली. मुख्य चौकातील स्नेहा स्नॅक्स सेंटर शेजारी ग्राहकांना बसण्यासाठी छोटेसे गाळा घेऊन त्या समोर हातगाडी थाटुन आपला वडा पाव चा व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू केला. कोरोना पुर्वी एकदा सकाळी सुरु झाला की रात्री ९.३०वा व्यवसाय बंद व्हायचे. रामभाऊ चे चिरंजीव विनोद उर्फ खंडु दिवस रात्र श्रम करीत व्यवसाय प्रगती पथावर नेत आहेत. वडिलां प्रमाणेच वडा पाव वर ताव मारणार्यां खवय्यांची गर्दी खिचत आहेत. आज रामभाऊ वडेवाले यांचा वडापाव प्रसिद्ध असल्याने लांब लांब चे लोक वडापाव खाण्यासाठी या सेंटरवर येतात. वृत संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे महाराष्ट्र देहूरोड पुणे.

YOUR REACTION?

Facebook Conversations