राज्यपालांनी महा पुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड, छावा संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करणार होते,या पार्श्वभूमीवर नियोजित दौराच रद्द केल्याची चर्चा दिवस भर सुरु होती.

पुणे,पिंपरी : दि.27

      राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे रविवारी एका कार्यक्रमासाठी चिंचवडमध्ये येणार होते. मात्र यापूर्वी राज्यपालांनी महा पुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड, छावा संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करणार होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मात्र राज्यपाल कोश्यारी हे लोणावळा येथील कार्यक्रम उरकून चिंचवडला न येता राज्यपाल थेट पुण्यातील राजभवन गाठले. त्यामुळे राज्यपाल यांनी वादग्रस्त वक्तव्य वरून दौरा रद्द केल्याची चर्चा संपूर्ण शहरभर सुरू होती.


          याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारपासून (ता.27 मार्च) दोन दिवसांच्या पुणे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी सकाळी लोणावळ्यात पुरस्कार वितरण केले. सायंकाळी पुण्यातील कार्यक्रमालाही ते हजेरी लावणार होते. मात्र, दुपारी नियोजित दौऱ्यातील त्यांचा चिंचवडचा पुरस्कार सोहळा अचानक रद्द करण्यात आला. त्यात गोंधळ होण्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्याला राज्यपाल आले नाही, असे समजते. त्यामुळे लोणावळ्यानंतर चिंचवडचा कार्यक्रम न करता राज्यपालांनी थेट पुण्यातील राजभवन गाठले. राज्यपाल आले नाही, तरी त्यांच्या या नियोजित व नंतर रद्द झालेल्या चिंचवड दौऱ्याचा फटका संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे व त्यांच्यासह तीन पदाधिकारी यांना बसला. राज्यपालांनी छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या या दौऱ्यात त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. तर, राज्यपालांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मारुती भापकरांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे भापकरांना सकाळीच पिंपरी ठाण्यात आणून बसविण्यात आले. अशीच कारवाई चिंचवड पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांना दौऱ्याच्या एक दिवस आधीच शनिवार 26 मार्च 2022 रोजीच काळे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यानंतर वाकड पोलिस स्टेशन येथे रविवारी दिवसभर स्थानबद्ध करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांना राज्यपालांच्या कार्यक्रमात कसलेही विघ्न न आणण्याची अन्यथा कारवाईचा इशारा देणारी प्रतिबंधात्मक नोटीसही चिंचवड पोलिसांनी ता. 26 मार्च बजावली होती. तसेच पुणे ग्रामीण मध्येही लोणावळा येथे कार्यक्रम असल्यामुळे पुणे ग्रामीण च्या पोलिस अधिकाऱ्यांनी सतीश काळे यांना शनिवार दिनांक 26 मार्च रोजीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 27 मार्च रोजी दिवसभर वाकड पोलिस स्टेशन येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. चिंचवडच्या कार्यक्रमात अनुचित प्रकार होण्याचा अहवाल एलआयबीनेही दिला होता. त्यामुळेच तो रद्द झाल्याचे कळते. दरम्यान, दुपारी दोनच्या चिंचवडच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल हे येणार नाहीत, हे दुपारी तीन वाजता कळले. तरीही पोलिसांनी न सोडल्याने सतिश काळे यांनी संताप व्यक्त केला. सायंकाळी साडेचार वाजता त्यांची सुटका करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत राज्यपालांनी जाहीर कार्यक्रमांत अनुचित उदगार काढलेले आहेत. म्हणून त्यांनी आज चिंचवडमध्ये जाहीर माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली होती. तर याच वेळी याच कारणावरून संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी काळ्या फिती लावून राज्यपालांचा निषेध करणार होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations