माझ्या सारख्या संत समाज सुधारक आणि शुरवीरांच्या महान भुमित राज्य सेवक, राज्यपाल होण्याचा मला बहुमान मिळाले हे माझे अहोभाग्य उर्वरित काळ चिंतन मनन अध्ययनात घालवण्याची इच्छा.

  मुंबई दि. २३ :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. राज्यपाल कोश्यारी मुळे मध्यंतरी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते महात्मा फुले सावित्रीबाई यांच्या बद्दल अपशब्द बोलुन गरळ ओकले होते तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारून पुतळा दहन करून निषेध व्यक्त केले आणि राजीनाम्याची मागणी अनेक राजकीय मंडळीने व सामाजिक संघटनेचे लोकांनी केली होती.

 या नंतर आता स्वत: कोश्यारी राजीनामा द्यायची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाकडून माहिती देण्यात आली आहे.राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन आणि मनन करण्यात घालवायचा आपला मानस आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवल्याची माहिती गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र या अधिकृत ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

महाराष्ट्रा सारख्या संत, समाज सुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे, हे माझ्याकरिता अहोभाग्य आहे.

गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे.आणि अशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या मनोगतात म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations