रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या१० मे ला विविध मागण्या साठी राज्य व्यापी अंदोलन करण्याचा रिपब्लिकन राज्य कमिटीच्या बैठकित निर्णय

पुणे दि. २३

            मशिदीं वरील भोंगे हटविण्या बाबत अल्टीमेटम देऊन त्या नंतर माशिदीं वरील भोंगे जबरदस्ती ने काढण्याचा ईशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.दादागिरी करणे काय राज ठाकरेंनाच जमते का ? असा सवाल करीत त्यांच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या भूमिकेचा आपण तात्विक विरोध केला आहे. मात्र आता रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या चुकीच्या भूमिकेला कृतीशील विरोध करावा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे. जेथे मशिदींवरील भोंगे जबरदस्ती काढले जात असतील तर तिथे मुस्लिम बांधवांच्या पाठीशी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी उभे रहावे .

जिथे हिंदू बंधवांवर अन्याय होईल .तिथे हिंदू बांधवांच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पुढे यावे. असे कार्यकर्त्यांना सुचना देत देशात हिंदू मुस्लिम सह सर्व धर्मियांमध्ये सौहार्द बंधुत्व टिकविण्यासाठी राज ठाकरे सारख्यांच्या फुटीर भडकावू आणि भेदभाव जनक समाजात दुही पाडणाऱ्या भूमिकेचा रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी कृतिशील विरोध करावा .असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले .

पुण्यात अल्पबचत भवन येथे रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणी च्या आयोजित बैठकीत ना.रामदास आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शन करत  होते. या वेळी पक्ष नेते अविनाश महातेकर; भुपेश थुलकर;राजा सरवदे; बाबुराव कदम;पप्पू कागदे; हनुमंत साठे;विवेक कांबळे; परशुराम वाडेकर; ; शैलेंद्र चव्हाण;महिपाल वाघमारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

 आयोजित राज्य व्यापी अंदोलनात राज्य सरकार मध्ये मागासवर्गीयां चे नोकरी मधील अनुशेष भरून काढावा; भूमिहीनांना प्रत्येकी ५ एकर जमीन द्यावी; २०१९पर्यंत च्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्यावी; बढत्या मध्ये एस .सी .एस .टी. वर्गाला आरक्षण देण्यात यावे; मराठा समाजाला आरक्षण द्यावे; स्थानिक स्वराज्य संस्थां मध्ये ओ.बी.सी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे. या मुख मागण्या सह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या दि.१०मे ला राज्यभर सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शने ;मोर्चे आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय आज रिपाइं च्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आल्याची माहिती ना .रामदास आठवले यांनी दिली. तसेच

रिपब्लिकन पक्षाची सभासद नोंदणी मोहीम पूर्ण करून येत्या दि.१५ जून पर्यंत सभासद शुल्क पक्षाच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात जमा करावे. असा अंतीम आदेश पक्ष कार्यकर्त्यांना रामदास आठवले यांनी आज जाहीर केला. असे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी कळविले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations