राष्ट्रीय अंध फुटबाॅल महासंघ (आय.बी.एफ.एफ.) व पुणे माई बाल भवन या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने पुणे ईम्पेट्युस टर्फ मैदानावर आयोजन.

पुणे

         भारतीय अंध फुटबाॅल संघ व पुणे माई बाल भवन या ख्यातनाम संस्थेच्या वतीने येत्या २४ मे ते २६ मे या कालावधीत पुणे ईम्पेट्युस टर्फ मैदानावर महिला राष्ट्रीय अंध फुटबाॅल द्वितीय स्पर्धेचे आयोजन केल्याचे व या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र,गुजरात, मध्य प्रदेश ,कर्नाटक ,हैद्राबाद, तामीळनाडू , बिहार ,वेस्ट बंगाल, या राज्यातील महिला अंध खेळाडु भाग घेणार असल्याचे या आगळ्या वेगळ्या आणि लक्षवेधी फुटबाॅल सामन्यांचे संयोजक मधुकर ईंगळे यांनी द जस्ट आज राष्ट्रीय वृत्त वाहिनीला माहिती देताना दिली. या स्पर्धेचे अधिक माहिती देताना मधुकर ईंगळे म्हणाले २४ मे २०२२ला गट टप्यातील सामने सांयकाळी ४ ते रात्री १० या वेळेत होतील. २५ मे २॰२२ ला गट टप्प्यातील सामने व उपांत्य फेरी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत होतील. २६ मे२०२२ ला सांयकाळी ५ वा.पासुन अंतिम सामने होतील. अशी आयोजित सामन्यांची महिती देऊन मधुकर ईंगळे म्हणाले माईं बाल भवन चे सारिका ब्ररूड, भाग्यश्री रूग्गी, दिपाली कांबळे ,दिपाली पवार, कोमल गायकवाड, या खेळाडू महाराष्ट्र राज्या कडुन खेळणार आहेत. या संघा चे प्रशिक्षक विक्रमसिंग गोल किपर हर्षदा काळभोर ,वेदा गंबोळे आहेत. तर संयोजन रूचिरा ईंगळे ,प्रवीण देशपांडे करीत आहेत.

 भारतीय अंध फुटबाॅल महासंघाची माहिती देताना ईंगळे म्हणाले. भारतीय अंध फुटबाॅल महासंघ ही भारतातील अंध फुटबाॅल ला प्रोत्साहन देण्यासाठी पॅरालिम्पिक समिती व भारतीय अंध क्रिडा संघटना नवी दिल्ली यांच्याशी सलग्न असलेली स्वतंत्र संघटना आहे. भारतीय फुटबाॅल महासंघ या खेळाच्या प्रचारा साठी खेळाडुंना प्रशिक्षण आणि मदत करीत आहे. देश भरातील दृष्टीहीन प्रभावंताना खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे व राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवुन संप्टेबंर २०१७ पासुन कोची त फक्त पुर्ण वेळ अंध फुटबाॅल अकादमी चालविते अशी माहिती ईंगळे यांनी दिली. राष्ट्रीय स्तरावर देहूरोड च्या माई बाल भवन च्या महिला अंध खेळाडुनीं उत्तम बाजी मारत महाराष्ट्र राज्याची शान राखणार्या माई बाल भवन संस्थेची माहिती देताना मधुकर ईंगळे म्हणाले माई बाल भवन हि संस्था गेल्या १५ वर्षा पासुन सुविधा नसतांना अडी अडचणीतुन मार्ग काढत व दिव्यांग असलेल्यां साठी कार्य करणारी संस्थाआहे. सर्वात म्हत्वाचे म्हणजे आम्ही त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढवुन त्यांच्या भावी भविष्या साठी स्वप्ने साकार करण्याची संधी देतो. आर्थीकदृष्ट्या , शैक्षणिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या असलेल्यांसाठी त्यांचा सर्वागींण विकास घडविण्यासाठी माई बाल भवन अहोरात्र श्रम घेत आहोत .ची राष्ट्रीय स्तरावरील खेळाडुंची उज्वल कामगीरी म्हणजे करीत असलेल्या परिश्रपरिश्रमाचेचिज आहे. अंध म्हणजे ब्लाईंड फुटबाॅल खेळा विषयी माहिती देताना मधुकर ईंगळे म्हणाले. ब्लाईंड फुटबाॅल हा 40 m ×20 m आकाराचा फुटसल मैदानात खेळला जाणारा 5 a बाजु खेळ आहे. ज्या मध्ये बाजू बाजुच्या बोर्ड सह बंद केल्या जातात. जगभरातील जवळपास ६४ देशा मध्ये हा खेळ खेळला जातो. जागतीक क्रमवारीत भारत २५ व्या क्रमाकांवर आहे. अशा या स्पर्धेचे आयोजन करीत आहोत की या स्पर्धेत भारतातील १० राज्यातील अंध महिला संघ सहभागी आहेत.हि अभिमानाची बाब आहे. असे मधुकर ईंगळे यांनी माहिती देताना दिली.

YOUR REACTION?

Facebook Conversations